राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबई महाराष्ट्र शासन सदस्य सचिव यांची अझोला प्रकल्पास भेट.
लोकवेध लाईव्ह न्यूज
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी- सचिन लगड
अकोले तालुक्यातील प्रवरा पट्ट्यातील गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या अझोला पशुधनास उत्कृष्ट पूरक पोषण आहार प्रकल्पास राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासनाचे डॉ.एन .जी.शहा सदस्य सचिव , डॉ.अरुण सप्रे सदस्य, डॉ.पराग दुपारे, शास्त्रज्ञ आणि बाएफ चे महाराष्ट्र राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी ढोकरी गावातील अझोला उत्पादक1या22 शेतकऱ्यांच्या अझोला बेडला भेट देऊन अझोला उपक्रमाची माहिती जाणून घेतली. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य पुरस्कृत आणि बायक संस्था संचलित अझोला पशुधनासाठी उत्कृष्ट पूरक पोषण आहार निर्मिती प्रकल्प अकोले तालुक्यातील इंदोरी, उंचखडक, टाकळी, ढोकरी, वाशेरे , परखतपूर खिरविरे ,कोंभाळणे या गावांमध्ये 2019 या वर्षापासून सुरू आहे उच्च प्रतीचे दूध मिळविण्यासाठी दुधाळ जनावरांना आझोला कल्चर पशुखाद्यात मिसळून दिल्यास दुधाची फॅट सुधारण्यास मदत होते .पशुखाद्यासोबत दूध देणाऱ्या जनावरांना प्रतिदिन 200 ग्रॅम अझोला एकत्र करून देण्यात येतो, त्यानुसार अकोले संगमनेर तालुक्यात मागील तीन वर्षांमध्ये 348 दूध उत्पादक शेतकऱ्यांना या प्रकल्पातून लाभ देण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार व उच्च प्रतीचे दूध निर्मितीसाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे, प्रकल्पाच्या माध्यमातून अझोला उत्पादक शेतकऱ्यांना अझोला निर्मितीसाठी बेड ,अझोला कल्चर, अझोला उत्पादनाचे प्रशिक्षण, अभ्यास दौरा यासाठी विशेष सहकार्य करण्यात आले. वेळोवेळी प्रत्यक्ष फिल्डवर शेतकऱ्यांकडे नियमित आझोला पशुखाद्याची निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.आज प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी दरम्यान आलेल्या शास्त्रज्ञांनी अझोला युक्त मुरघास, अझोला पावडर आदी उपक्रमाना भेट देऊन माहिती जाणून घेतली.या वेळी सुनीता अर्जुन शेटे, मीना विजय पुंडे, साधना नंदकुमार पुंडे योगिता संजय पाटोळे, अरुणा सुभाष पुंडे, आशा बबन पुंडे आणि अझोला कल्चर उत्पादक शारदा बबन शेटे या शेतकऱ्यांच्या शेतावर अझोला उत्पादन प्रकल्पास भेट देऊन बोलक्या प्रतिक्रिया ऐकून होत असलेल्या फायद्याबाबत आनंद व्यक्त केला व कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून शेतकऱ्यांना फायदा मिळत असल्याचे सर्व समक्ष जाहीर करून दिले . प्रकल्प यशस्वी होण्यासाठी बायफ संस्थेच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र उरळीकांचन येथून सदाशिव निंबाळकर ,तांत्रिक कार्यक्रम अधिकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र उरुळी कांचन, दीपक पाटील, वरिष्ठ संशोधन अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले .
आजच्या शेतकरी उत्पादक शेतकरी मेळाव्यात संपतराव वाकचौरे ,ललिता अशोक शेटे,बबनराव धोंडीबा शेटे यांनी अझोला उत्पादनाबाबतचे अनुभव आणि झालेला फायदा याबाबत माहिती दिली ,
क्षेत्र भेटीनंतर आझोला उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करून या मेळाव्याला डॉ. एन. जी. शहा , डॉ. अरुण सप्रे यांनी मार्गदर्शन केले तसेच तसेच बायफ संस्थेचे राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी देखील बायफ संस्था राबवत असलेले विविध उपक्रमाबाबत माहिती देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक योगेश नवले व बबन धोंडीबा शेटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले .
या शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष गावच्या सरपंच सौ बेबीताई दत्तात्रय शेटे होते शेतकरी मेळाव्यासाठी ढोकरी, टाकळी, कोंभाळणे,वाशेरे ,अकोले येथील अझोला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या क्षेत्रभेटीचे नियोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी केले असून आभार अकोले बायफ विभागप्रमुख रामनाथ नवले यांनी मानले
