अंभोरेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
सर्व धर्म समभाव दर्शवीत सामाजिक समता,बंधुता,एकतेचा संदेश देण्यात आला

संगमनेर : लोकवेध live न्यूज
अंभोरे ता.संगमनेर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी.जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी 10 वा.संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,राजमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले
.समवेत सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय सहादु दामू खेमनर,ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय किसनराव खेमनर,सोसायटी चेअरमन सन्माननीय रावजी भागा खेमनर,संचालक सन्माननीय भागवत खेमनर,रमेशराव खेमनर,सन्माननीय बबन सुभा खेमनर,दुध संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय तुळशीराम मलगुंडे,ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भाऊसाहेब खेमनर,कोंडाजी वाघमोडे,विठोबा जाणकु खेमनर,ज्योतिबा जगनर, आदी स्थानिक संस्थाचे पदाधिकारी,ग्रामस्थ,भिमगर्जना तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी 10 ते 4 संगमनेर येथिल अर्पण ब्लड बँक यांचे सहकार्यातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले मोठ्या संख्खेने तरुणांकडून रक्तदान करण्यात आले
.दुपारी 4 ते 7 भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीत सर्व प्रकारचे ध्वज फडकावत सर्व धर्म समभाव दर्शवीत सामाजिक समता,बंधुता,एकतेचा संदेश देण्यात आला.रात्री 7.30 वा.अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन,दीपप्रज्वलन उपस्थित मान्यंवरांचे हस्ते झाले.समाज सेवक सन्माननीय प्रा.बाबा खरात सर ,यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवनावरील विचार मांडले.
त्यांचे समवेत स्टेट बँक शाखा संगमनेर येथिल ब्रँच मँनेजर सन्माननीय वैभव कदम,सन्माननीय सुभाषराव हळ्नोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संविधान वाचन कुमारी अम्रपाली गायकवाड़ हिने केले. अकाशातील ग्रह,तारे,जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणी माझ्या मनगटाचा काय उपयोग?असे डॉ.बाबासाहेब म्हणत असे.बहुजन समाजाची सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,राजकिय,परिस्थिती प्रगतीपथावर नेण्यासाठी डॉ.बाबासाहेबांचे खुप मोठे योगदान आहे.दलित समाजाला जातीय भेदाच्या परकिय गुलाम गिरीतून मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण जिवन समर्पित केले.समता,बंधुता,निर्माण केली.स्री पुरुष समानता,यावर भर दिला.डॉ.बाबासाहेब नेहमी अन्याय करणारा गुन्हेगार नाही तर अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार आहे.म्हणून अन्यायाविरुध्द कायद्याच्या मार्गाने बंड करुन उठा आणी आपले अधिकार आणी हक्क कायदेशीर मार्गाने हिसकावुन घ्या असा सल्ला आणी मार्गदर्शन केले.शिका,संघटीत व्हा आणी संघर्ष करा या संदेशाची त्यांनी आयुष्यभर स्वत:जगले,तशी अमंल बजावणी केली.आणी सर्वांना प्रेरित केले.मोजू कशी उंची तुमच्या कर्तुत्वाची,तुम्ही जगाला दाखविली व्याख्या माणुसकीची,तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हता,तुम्ही मानसातलया मानुसकीची पुजा करणारे खरे महामानव होता.अशा या महा मानवाला आपण ज्यांच्यामुळे उभे आहोत.आपणा.सर्वांनाच ज्यांनी अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्त केले विज्ञानाच्या,समतेच्या मार्गाने विश्वशांतीदुत गौतम बुद्ध यांनी बौद्ध धम्म दिला आणी संपूर्ण जीवनच प्रेरित होउन जीवनातील प्रत्येक क्षणा क्षणाला स्पर्श करुन भारतीय समाजाला आधुनिकतेची ओळख निर्माण करुन नव भारत निर्माण केला.अनेक शेतकरी जो समाज कष्ट,दारिद्रयांच्या खाईत हालआपेष्टा सहन करुन जगत होता त्या भारतीय समाजाला नेहमीच प्रेरित करणारा हया महमानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.अशा या महामानवाला,त्यांच्या स्मृतींना ,विचारांना अभिवादन! या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय किसनराव खेमनर,सदस्य सन्माननीय संपत खेमनर,प्रा.नारायण खेमनर,रमेशराव खेमनर,बबनराव खेमनर,गौतम भालेराव,भिमगर्जना मित्र मंडळाचे सनी गायकवाड़,कैलास गायकवाड़,अनिल गायकवाड़,आदेश गायकवाड़,सोपान गायकवाड़,मानवेल गायकवाड़,गणेश गायकवाड़,यांनी उपस्थित मांन्यवरांचा सत्कार केला.रात्री 9 वा.जिंतेन्द्र शेजाळ यांचा भीम संध्या प्रस्तुत भीम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मोठ्या संख्येने ग्रामस्थ,महिला,भीम प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सनी गायकवाड़,आभार उपसरपंच किसनराव खेमनर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम गर्जना मित्र मंडळाचे श्री.सनी गायकवाड़ , कैलास गायकवाड़,बाळासाहेब गायकवाड़,अनिल गायकवाड,विशाल गायकवाड़,मंगेश गायकवाड़,भारत गायकवाड,अशितोष गायकवाड़,अभिनव गायकवाड़,पंकज गायकवाड़,अमोल गायकवाड़,अजय गायकवाड़,अजित गायकवाड़,आक्षय गायकवाड,राहुल गायकवाड,लुकास गायकवाड,अनिकेत गायकवाड,श्रीकांत गायकवाड,राजेश गायकवाड,सागर गायकवाड,साईश गायकवाड,युवराज गायकवाड,समीर मनियार,राहुल काळे ,अभिमान यादव,ज्ञानेश्वर मोहिते,आदी उपस्थित होते.
