मालुंजेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय आनंदमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी झाली

यावेळी मालुंजे गावातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांवर तरुण तरुणी महिला भगिनी आणि वृद्धांनी ठेका धरला
यावेळी मिरवणुकीत फटाक्यांच्या आतिषबाजीने व बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणांनी गाव दुमदुमून गेले होते

मिरवणुकीनंतर तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले बुद्ध वंदना झाली गावातील तसेच पाहुण्यांनी सुंदर कर्ण मधुर भाषणे केले.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाचे पंचक्रोशीत चर्चा झाली