शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यासाठी दिले निवेदन
संगमनेर – अण्णासाहेब काळे
संगमनेर येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे यांनी संगमनेर बस स्थानकास हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब. ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. तसेच संगमनेर येथे आरटीओ कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी संगमनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केले आहे.
प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने संगमनेर येथे परिवहन विभागाचे कार्यालय हो नि गरजेचे असून सध्या आम्हाला श्रीरामपूर येथे ५५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. तसेच श्रीरामपूर आरटीओ येथे कामाचा व्याप वाढलेला असल्यामुळे बन्याच वेळेस संगमनेर येथील नागरिकांची का प्रलंबित राहत असतात. तसेच online प्रक्रिया झाल्यापासून त्याचे स्लॉट नुसार कामकाज सुरू असते यामध्ये लिमिटेड कोटा असल्यामुळे कामे प्रलंबित राहत आहे.संगमनेर व अकोले येथील वाहन चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन नवीन परिवहन कार्यालयास मंजुरीही त्यासाठी संगमनेर शासकीय जागा सुद्धा उपलब्ध आहे.

तसेच संगमनेर येथील बस स्थानक व्यापारी संकुल २०१९ मध्ये पूर्ण झालेले असून त्यामधे अदाजे १२० व्यावसायिक व्यवसाय करत आहे. यापूर्वी आम्ही स्थानिक पातळीवर याबाबत मागणी केली होती परंतु त्यावेळेस स्थानिक आमदार थोरात यांनी व बीओटी विकासक काँग्रेस नेते का यांनी ते हाणून पाडलेले आहे. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की, आपण व्यापारी संकुलाला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब. ठाकरे यांचे नाव देणे बाबत परिवहन विभागास आदेश द्यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे यांनी निवेदन द्वारे केली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
