पिंपरणेकरांनी अनुभवला जिल्हास्तरीय कुस्त्यांचा थरार ;
मुलींच्या कुस्तीने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याची पारणे फिटले
लक्ष्मीआई यात्रा उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील नवसाला पावणारी लक्ष्मी आई देवी यात्रा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पाडला यात्रा उत्सवा निमित्त यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दि १९ रोजी सकाळी देवीला गंगा स्नान घालुन महाआरती करण्यात आली .

यावेळी गावचे सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर, काकासाहेब गायकवाड, शिवराम वाकचौरे, अरुण देशमुख, दिनकर वाकचौरे, गंगाराम वाकचौरे ,अण्णासाहेब वाकचौरे ,अजित देशमुख, राजेंद्र देशमुख ,रवींद्र रोहम, राजेंद्र देशमुख, संतोष वाकचौरे ,अजित मांडे, संजय बागुल, भीमा राहिंज, सुरेश कर्पे, पो.पा.विनोद साळवे, नवनीत देशमुख,श्रीकांत बागुल, किशोर जोर्वेकर, कल्याण जोर्वेकर, सुधीर रोहम, निलेश चत्तर, दिनकर ठोंबरे ,राहुल निकम, संदीप ठोंबरे, रामनाथ काळे, राहुल बागुल, पत्रकार सुभाष भालेराव, पोपट साळवे, अनिल ठोंबरे, सनी राहिंज, संतोष देशमुख, राजू भुसारी, सुखदेव रहिंज, प्रभूतात्या राहिंज, राजेंद्र वाकचौरे, सतीशभाऊ देशमुख, रावसाहेब ठोंबरे, दादाभाऊ रकटे, दीपक अभंग,आदी उपस्थित होते

परंपरेनुसार गावातील सर्व देवी देवतांना शेंदूर लावणे व मंदिर लावणे हा कार्यक्रम झाला देवीला शेंदूर लावण्याची परंपरा आहे त्यानुसार देवीला शेंदूर लावण्यात आला आणि यात्रेला सुरुवात झाली भाविकांनी सकाळपासून दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती तर काहींनी आपली नवसपूर्ती केले सायंकाळी देवीचा छबिना चोळी पातळ मिरवणूक काढण्यात आली
मिरवणुकीनंतर सामूहिक देवीची आरती घेण्यात आली त्यानंतर आकर्षक फटाक्यांची आतिशबाजी चा कार्यक्रम झाला
यात्रेनिमित्त लक्ष्मी आई मंदिरावर तसेच गावातील सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री आम्रपाली पुणेकर सह बाळासाहेब बेल्हेकर यांचा लोकनाट्य मनोरंजनाचा कार्यक्रम झाला
दिनांक २० रोजी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या तरुणींच्या कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांची पारणे फिटले यावेळी जिल्हाभरातून विविध ठिकाणच्या मल्लांनी आपली ताकद आजमावली

यात्रा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी आई यात्रा कमिटी,सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील गावातील विविध संस्था , तसेच तरुणांनी विशेष परिश्रम घेतले
