बसमधून पुण्यात सव्वा कोटीचे ड्रग्ज , खराडीमध्ये उतरताच थेट तुरुंगात पोहोचले तिघे
हे सर्व खराडी बस स्टॉपजवळ उभे असलेले आढळून आले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सव्वा कोटी किमतीचे ड्रग्ज आढळून आले
पुणे : लोकवेध live न्यूज 
 पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याठिकाणी ट्रॅव्हलसने ड्रग्ज घेऊन येणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास सव्वा कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेतील आरोपी क्रमांक 1 आणि 2 हे शनिवारी रतलाम येथून एमडी हे ड्रग्ज घेऊन ट्रॅव्हल्सने खराडी बस स्टॉपला उतरले. आरोपी क्रमांक तीन हा तिथे त्यांची वाट पाहत थांबलेला होता. आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक किलो 108 ग्रॅम एमडी हे ड्रग्ज आढळून आले. याची किंमत सुमारे 1,21,60,000/ (एक कोटी 21 लाख) इतकी आहे
बसमधून पुण्यात आणले सव्वा कोटीचे ड्रग्ज, खराडीमध्ये उतरताच थेट तुरुंगात पोहोचले तिघे हे सर्व खराडी बस स्टॉपजवळ उभे असलेले आढळून आले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सव्वा कोटी किमतीचे ड्रग्ज आढळून आले. हे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आरोपाींनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!