अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल जिल्ह्यातील पहिली केंब्रिज सलग्न शाळा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल हे केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डाशी(CAIE) संलग्न झाले असून हे स्कूल जिल्ह्यातील केंब्रिची संलग्न होणारे पहिले स्कूल ठरले असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
या स्कूल बाबत अधिक माहिती देताना सौ शरयूताई देशमुख म्हणाल्या की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे याकरता अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल सुरू झाले आहे.
या स्कूलमधून विद्यार्थ्यांना केवळ आशिया पेक्षा कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून दर्जेदार शिक्षण देण्याच्या पद्धत सुरू आहे. शाळेचे स्वतंत्र शिक्षण आणि 21 व्या शतकातील कौशल्य या प्रक्रियेसह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. याचबरोबर स्कूल मधील स्टुडिओ, आर्ट कार्यक्रम, विद्यार्थ्यांना चित्रकला, नृत्य ,संगीत आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या इतर प्रकारांद्वारे सर्जनशीलता वाढवण्यास वाव दिला जातो.
केंब्रिजच्या संलग्नतेसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रणालीतील अत्यंत कठीण मापदंड असून ज्यामध्ये शिकवण्याच्या पद्धती ,अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा ,विद्यार्थ्यांशी सुसंवाद, अडीअडचणी बाबद पालकांशी संवाद, गुणवत्ता, विविध उपक्रम, खेळांचे उपक्रम, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष कार्यक्रम ,निकाल या सर्व बाबींची मूल्यांकन केले जाते. केंब्रिजच्या संलग्नतेसाठी प्राचार्य अंजली कन्नवार, डॉ. वृषाली साबळे, स्नेहल शेकदार, नीता खरडे, स्मिता कासार ,प्रा. जी.बी. काळे यांनी विशेष प्रयत्न केले.
जिल्ह्यात प्रथम झालेल्या संलग्नतेबद्दल माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ, प्राचार्य अंजली कन्नवार आदींनी अभिनंदन केले आहे.
