ध्येयापर्यंत पोहचण्यास कष्टाचे इंधन गरजेचे -अॅड.मनोहरराव देशमुख.

प्राचार्य मनोहर लेंडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न.

 

पिंपळगाव नाकविंदा 

लोकवेध live न्यूज / सचिन लगड

 

 

पाठीवरची थाप आणि डोक्यावरचा हात माणसाला जगण्याचे सामर्थ्य देतात. त्यासाठी ध्येय निश्चित करा.जीवणात काम करत असताना कष्टाने प्रेरीत व्हा.कारण ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कष्टाचे इंधन गरजेचे असते. असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख यांनी केले.
गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथील प्राचार्य मनोहर लेंडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अॅड.मनोहरराव देशमुख व्यासपिठावरून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन हे होते.
याप्रसंगि सत्कारमुर्ती प्राचार्य मनोहर लेंडे, सौ.सुनिता लेंडे,आमदार डॉ. किरण लहामटे, सरपंच पुष्पाताई निगळे,संस्थेचे सचिव टि. एन.कानवडे, संचालक मारूती मुठे, नंदकिशोर बेल्हेकर,चिमणराव देशमुख,विजय पवार, श्रीराम पन्हाळे,रामजी काठे, विलास पाबळकर,उपप्राचार्य बादशहा ताजण,माजी प्राचार्य विलास नवले, प्राचार्य बाबासाहेब देशमुख,सुनिल धुमाळ,लहानु पर्बत, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे, के.एल.नवले, संजय शिंदे,शिवाजी नरसाळे,एन.आर. वाकचौरे, श्रीनिवास एलमामे, विनय सावंत यांसह सत्यनिकेतन परिवारातील सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी -माजी विदयार्थी, ग्रामस्थ, नांदुरखंदारमाळचे ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. देशमुख यांनी ज्या कार्यात संपूर्ण श्रद्धा ओतली जाते, जे कार्य मनापासून केले जाते त्या कार्याचे फळ निश्चित मिळते. शक्य तेव्हढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काहीच रहात नाही. त्यासाठी कामात सतत व्यस्त असाव.असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकजी मदन यांनी काम करण्याची पद्धत मानसीक वयावर अवलंबून असते.त्यासाठी सतत कामात मग्न राहील्याने भिती चिंता दुर होते. चांगले आरोग्य लाभते. असे विचार प्रतिपादीत केले.
आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आपल्यातील प्रेरणाशक्तीचा वापर करा.यशाचे शिखर गाठायचे असेल तर यशाची पहिली पायरी म्हणजे निर्णय घेणे आहे. कार्यपूर्ती हा आनंदाचा सोहळा आहे,त्यामुळे ऋणानुबंध कायम ठेवा.आयुष्यात जे चांगले ते घ्या. संस्थेची नाळ तुटणार नाही.सत्यनिकेतन संस्था मातृभूमी असल्याचे मत प्रतिपादीत केले.
संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे यांनी चांगले व्यक्तीमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते. नशिबाचे दार आपोआप कधीच उघडत नाही. ते मेहनत करूनच उघडावे लागते. त्यासाठी योग्य निर्णय घ्या. असे विचार व्यक्त केले.
विनय सावंत यांनी देहु, आळंदीत जावे तशी भावना सत्यनिकेतन परीवाराची आहे. या पवित्र भूमित आपण कार्य करतो याचे भाग्य लाभले. त्यासाठी आनंदाने कार्य करा. आनंदि चेहऱ्या मागे खुप काही दडलेले असल्याचा आशावाद व्यक्त केला.
यावेळी श्रीनिवास एलमामे,विलास नवले, विजय पवार, सुनिल सारूक्ते, प्रा.राधाकिसन पाबळे, नांदुरखंदारमाळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊ सागर, धनंजय पगारे आदींनी सेवापूर्तीपर मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
सत्कारमुर्ती प्राचार्य मनोहर लेंडे यांनी प्रत्येक क्षण हा योग्यच असतो.जीवनात काही तरी मोठे आणि चांगले साध्य करण्यासाठी उत्कट व उत्साही रहा.कल्पनाशक्तीला वाव दया. कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.सर्वांची साथ मिळाल्याने काम पूर्णत्वास गेल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य बादशहा ताजणे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.संतराम बारवकर यांनी केले. तर मधुकर मोखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी किशोर देशमुख यांच्या सुमधुर वाणीतुन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!