डिग्रस विद्यालयाने राबविले ग्राम स्वच्छता अभियान
लोकवेध live
पिंपरणे
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 23 फेब्रुवारी 2023 रोजी  सकाळी 8 वाजता सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयाने डिग्रस गावामध्ये ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
 गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव ‘ डेबूजी झिंगराजी जानोरकर ‘ होते. ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत व समाजसुधारक होते. ते  सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. मुख्यतः त्यांनी जीवनभर लोकसेवेचे व्रत अंगिकारून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद उच्चाटन, सामाजिक न्याय, चारित्र्य शिकवण, अंधश्रद्धेची कास सोडून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजवणारे संत गाडगे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
 या कार्यक्रमासाठी सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत श्री.बुवाजी बाबा पुणेकर व उपाध्यक्ष महंत श्री.  उमाजी बाबा पुणेकर , सचिव जानकीराम बुवाजी पुणेकर व डिग्रस गावचे सरपंच रंगनाथ बिडकर व इतर उपस्थित ग्रामस्थ यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे पालक प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
 विद्यालयापासून डिग्रस गावापर्यंत विद्यार्थ्यांनी स्वच्छता दिंडी काढून जनजागृती केली. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ गाव हे पथनाट्य गावात सादर केला. इयत्ता आठवीच्या मुला मुलींनी  व्यसनमुक्ती, स्वच्छता, शौचालयाचा वापर प्लास्टिक मुक्त गाव या आणि अशा अनेक विषयावरती आधारित नाटिका सादर केली. या पथनाटिकांसाठी मार्गदर्शक विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख साहेबराव नेहे व व प्रसिद्ध प्रमुख दिलीप दिवे यांनी केले. पक्षी संवर्धन या उपक्रमाचे सुरुवात याच कार्यक्रमापासून झाली पक्षांसाठी धान्य व पाणी ठेवण्यासाठी गावातील झाडांना भांडी बांधण्यात आली. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी गावठाणचा सर्व परिसर , गावातील सर्व मंदिरे व स्मशानभूमी या परिसराची  स्वच्छता केली.
   याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग बाचकर , विद्यालयाचे शिक्षक श्री.मच्छींद्र खेमनर  , दिलीप दिवे, साहेबराव नेहे, विजय शेंगाळ, महेंद्र पुणेकर, ज्योती चिंधे, मनिषा आचपळे, कारंडे, श्रीपत पांढरे, बारकु पुणेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षकविजय शेंगाळ सर व आभार  श्री दिलीप दिवे  यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!