भा.ज.प च्या निमंत्रित सदस्य युवा नेत्या भैरवी ताई वाघ यांचे संगमनेर मध्ये भव्य स्वागत

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज


गेल्या २दिवसांपुर्वी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले! मा आमदार,मा जिल्हा परिषद अध्यक्षा स्मिता ताई वाघ यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली व युवा नेत्या भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या सचिव व नाशिक जिल्ह्या भाजपच्या प्रभारी भैरवी ताई वाघ यांची प्रदेश निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली त्यानिमित्ताने शुक्रवार दि,५ रोजी युवा नेत्या भैरवी ताई वाघ नाशिक जिल्हा व संगमनेर दौऱ्यावर होत्या ताईंचे आगमन होताच संगमनेर तालुक्याचे युवा नेते आदरणीय विक्रमसिंह खताळ पाटील दादा युवा मंचच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले! फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले. यावेळी पिंपरणे गावचे सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख म्हणाले भारतीय जनता पक्ष वाढीमध्ये वाघ कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत आमचे मार्गदर्शक, जळगाव भाजपचे मा जिल्हाध्यक्ष स्व उदय (बापूसाहेब) वाघ व मा आमदार, जळगाव जिल्हा परिषदेच्या मा आमदार, महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मा अध्यक्ष आदरणीय स्मिता ताई वाघ घडलेले आहेत.या पदाला न्याय देण्याचे काम वाघ कुटुंबियांनी केले आहे. महाराष्ट्र भर मा आमदार स्मिता ताई वाघ व युवा नेत्या भैरवी ताई वाघ यांचा कार्यकर्त्यांशी जनसंपर्क आहे. त्यांना चांगल्या कामाची पावती पक्षाने दिली आहे! नानासाहेब देशमुख म्हणाले ताईंचा प्रवास हा जनसंघापासून आहे अशीच त्यांची भरभराट होवो असे प्रतिपादन केले. ङि एम देशमुख म्हणाले ताईंच्या कामाची पावती म्हणून पक्षाने हे पद मिळाले भावी वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी शुभम देशमुख,नानासाहेब देशमुख, ङि एम देशमुख, संचित भारती, निखिल लेंङे, ओम खंडागळे, रूपेश राहिंज, हरिष बागूल,संजय गायकवाड उपस्थित होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!