केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे महा अधिवेशन _ आशिष शेळके
कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
शिर्डी येथे होणार्‍या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या भव्यदिव्य महा अधिवेशनला कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे रिपाई संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले .
संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महत्त्वपूर्ण बैठक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली.
 28 मे 2023 रोजी रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशन नियोजनाची चर्चा करण्यात आली.
यावेळी श्रीकांत भालेराव यांनी अधिवेशनासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते शिर्डी येथे येणार आहेत. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध तयारी करणे गरजेचे आहे. यामध्ये चलो शिर्डी चलो शिर्डी अशा प्रकारचे वॉल पेंटिंग करणे, शहरांमध्ये तालुक्यामध्ये छोटे छोटे पोस्टर लावणे, त्याचप्रमाणे शहरातील व तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर लावणे. अशाप्रकारे वातावरण निर्मिती तालुक्यांमध्ये करण्याचे सागितले .तर बाळासाहेब गायकवाड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितले.
यावेळी रिपाई संगमनेर तालुका कमिटीमध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येवून मराठा आघाडी तालुकाध्यक्ष गौतम वर्पे , तालुका संघटक  सिद्धार्थ अशोकराव खरात , तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम तर तालुका सह सरचिटणीस  नानासाहेब कदम यांची एक मताने नियुक्ती करण्यात आली यांना श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , दशरथ दरोळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
या निवडीबद्दल जिल्ह्याध्यक्ष सुरेंद्र थोरात , विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, युवकांचे अध्यक्ष पप्पू बनसोडे यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना फोन वरून शुभेच्छा दिल्या.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात, तालुका संघटक मधुकर सोनवणे, शहराध्यक्ष कैलास कासार, युवकांचे अध्यक्ष योगेश मुन्तोडे , तालुका सरचिटणीस विकास गायकवाड, शरदजी जमदाडे, पठारभाग प्रमुख सागर शिंदे, तालुका उपाध्यक्ष रमेश भोसले, तालुका सचिव जनार्दन साळवे, युवराज भालेराव, महिला तालुकाध्यक्ष रूपालीताई सोनवणे, केरूनाथ भोसले, धनगर आघाडीचे अध्यक्ष मिना बिडगर , रविभाऊ रोकडे,  सनी लोंढे, सौरभ शेळके, रोहित शेळके, सागर शेळके, विनायक शेळके, बाळासाहेब पवार, गौतम पवार, अभिषेक शेळके,योहान मिसाळ आदींनी प्रयत्न केले . तर शेवटी आभार शहराध्यक्ष कैलास कासार यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!