जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायात निवडणूक, मतदान, मतमाेजणी व जयंती साजरी हाेणार आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) नुसार ३० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायात निवडणूक, मतदान, मतमाेजणी व जयंती साजरी हाेणार आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे. हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींंना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही.
