प्रगतशील शेतकरी कै. पंढरीनाथ विश्राम बागुल यांच्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे परिसरातील प्रगतशील शेतकरी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले कैलासवासी पंढरीनाथ विश्राम बागुल यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवारी, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील सभागृह, दत्त मंदिराजवळ, जोर्वे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. बागुल कुटुंबीय व आप्तेष्टांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कै. पंढरीनाथ बागुल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कै. पंढरीनाथ बागुल यांनी आपल्या आयुष्यात शेतीसोबत सामाजिक जिव्हाळा जपत अनेकांशी आत्मीय संबंध निर्माण केले. त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, मेहनती स्वभाव आणि समाजातील सर्व स्तरांशी असलेल्या सलोख्यामुळे त्यांना परिसरात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रमाद्वारे त्यांच्या पवित्र स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, उपस्थित मान्यवर त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमास सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन समस्त बागुल परिवार व आप्तेष्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
