संगमनेर शहर पोलीस स्टेशन मध्ये संजय राऊत यांचे विरुद्ध तक्रार अर्ज
संजय  राऊत यांचे विरुद्ध खोटी तक्रार करणे, खोटचा गुन्हयामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणे, बदनामी करणे, राजकीय पक्षांमध्ये देश भावना, तेढ व वैमनस्य निर्माण केल्या बाबत तक्रारी अर्ज.
लोकवेध live न्यूज 
संगमनेर / अण्णासाहेब काळे
संगमनेर तालुक्यातील शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते रमेश धोंडीबा वाळे यांनी खासदार संजय राऊत यांचे विरुद्ध संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केला आहे
त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की

 संजय राऊत, खासदार असुन सामना वृत्तमान पत्राचे संपादक आहेत. सदर श्री. संजय राऊत यांनी दिनांक २०.०२.२०२३ रोजी प्रसार माध्यमांना मुलाखत देवुन त्यामध्ये हिंदी भाषेमध्ये खालीलप्रमाणे वक्तव्य केलेले आहे. ” श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत को खतम करने की एक सुपारी, जिसे बोलते हैं कॉन्ट्रक्ट किलींग, एक माफिया, जो अभी अभी जमानत पे छुटा है. राजा ठाकुर उनका नाम है उनको चे कॉन्ट्रक्ट किलींग का काम दिया है, यह मेरी जानकारी है, तो मेरा यह कर्तव्य बनता है, इस राज्य के बुध्दिमान गृहमंत्री देवेंद्र फडवणीसजी. मुंबई के पुलिस कमिशनर, ठाणा के पुलिस कमिशनर को यह अवगत करे. अशाचप्रकारे मुलाखती त्यांनी वेगवेगळचा वृत्तवाहिण्यांना दिल्या. तसेच तद्नंतर श्री. संजय राऊत यांनी यासंदर्भात लेखी तक्रारी अर्ज पोलीसांकडे सादर केला. श्री. संजय राऊत यांनी सदरचा खोटा अर्ज त्यांचे राजकीय व वैयक्तिक स्वार्थापोटी प्रसिद्धि मिळणेकामी केलेला आहे.


श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

 संजय राऊत यांनी आमचे शिवसेना पक्षाचे  श्रीकांत शिंदे, लोकसभेचे खासदार असुन त्यांचेवर आजतागायत गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप कधीही झालेले नाही. त्यांच्या विरोधात बदनामी कारक शब्दांचा वापर करून आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते व लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण केली. त्यामुळे मी स्वतः व माझ्या सारखे इतर कार्यकर्ते उदिग्न झालेलो आहोत. खा. संजय राऊत यांनी सदरची मुलाखत व खोटा तक्रारी अर्ज देवन राजकीय पक्ष व लोकांमध्ये देशाची भावना, तेट, वैमस्य निर्माण करण्याच्या जाणीवपूर्वक कृत्य केलेले आहे. तरी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांचे बाबत जाणीवपूर्वक खोटे आरोप करून, बदनामी कारक व द्वेश कारक बातमी पसरवुन समाजामध्ये देशाची भावना तेढ व वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वकरित्या केलेले आहे.
५. श्री. संजय राऊत यांचे सदरचे कृत्य भादवी कलम २११, १५३-अ, ५००, ५०१, ५०४, ५०५-२. प्रमाणे गंभीर गुन्हा आहे. तरी सदरचे गुन्हे दखलपात्र असुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!