चंदनेश्वर विद्यालयाचा नृत्य स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक ; नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत निवड
चंदनेश्वर विद्यालयाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा
संगमनेर / लोकवेध live न्यूज /अण्णासाहेब काळे

अखिल लोककला सांस्कृतिक संघ, पुणे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धा दि. १३ मे २०२३ रोजी पार पडल्या. या नृत्य स्पर्धेत देशातून २४ राज्यांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी, ता संगमनेर या विद्यालयाने ११ ते १४ वयोगटात राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळविला असून २५ ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी चंदनेश्वर विद्यालयाची निवड झाली आहे.
सदर स्पर्धेत विद्यालयातील प्रतीक्षा तुळशीराम ढेरंगे, सावरिया बारकू भालेराव, स्नेहल संदिप राहाणे, कार्तिकी दिलीप कढणे, सिद्धी संजय थोरात, तनुजा शिवाजी राहाणे, अफरीन नसीर नदाफ, तन्वी मंगेश राहाणे, भावना बाळू कौटे, आदित्य नवनाथ राहाणे या विद्यार्थ्यांनी श्री. देशमुख विश्वजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर करून देशात प्रथम क्रमांक मिळविला आणि विद्यालयाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला.
या उज्ज्वल यशाबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता श्री राजेंद्र राहाणे साहेब पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व क्षेत्रातील पालकांनी विद्यालयाचे तसेच सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक देशमुख सर यांचे कौतुक केले. या यशाबद्दल नृत्य मार्गदर्शक श्री. देशमुख विश्वजित सर व सहभागी विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील गुणगौरव संस्थेचे पदाधिकारी आनंदराव कढणे साहेब, रामदासजी राहाणे साहेब, विठ्ठलराव कढणे सर, रजिस्ट्रार एम एम फटांगरे सर, अनिलराव कढणे, अशोकराव राहाणे, नरेंद्र राहाणे,, सामाजिक कार्यकर्ते – आर बी शेठ राहाणे, रामभाऊ मार्तंड राहाणे, प्रदिप राहाणे सर, सीताराम राहाणे, राजेंद्र राहाणे सर, दत्तू दादा राहाणे, कैलास सरोदे, मंगेश राहाणे, नसीर नदाफ, सरपंच – श्री शंकरराव राहाणे, उपसरपंच भाऊराव राहाणे, माजी उपसरपंच विजू शेठ राहाणे, रोहिदास राहाणे, बाळू राहाणे, सुनिल राहाणे, मंगेश सरोदे व अन्नपूर्णा ग्रुप विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व मान्यवरांनी विद्यालयाच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
