संग्राम या संस्थेच्या देवेंद्र ओहरा मंतीमंद शाळेचा सन्मान
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पुणे – दिव्यांग कल्याण विभाग,दिव्यांग कल्याण आयुक्तलय महाराष्ट्र राज्य, जय वकील फाऊंडेशन मुबंई आणी बालकल्याण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिशा अभियान अंतर्गत सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात दिशा अभियानांतर्गतच्या प्रक्रियेतील सर्व टप्पे दिलेल्या कालावधीत उत्तमरीत्या पार पाडणाऱ्या राज्यातील १०४ बौद्धिक अक्षम प्रवर्गातील विशेष शाळांची निवड अभियानाकडून करण्यात आलेली होती. या अभियनात संगमनेरची संगम ग्राम विकास मंडळ ( संग्राम ) या संस्थेचे डॉ. देवेंद्र ओहरा मतीमंद विद्यालयाची निवड झाली. त्यानुसार एका दीमाखदार सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
समाजातील विशेष व्यक्ती, अपंग व मतिमंद विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात व आ. डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यक्ती म्हणून काम केले जात आहे.
संस्थेचे सेक्रेटरी डॉ.नामदेवराव गुंजाळ व मतीमंद शाळेचे मुख्यध्यापक चांगदेव खेमनर यानी हा सन्मान मा. ओमप्रकाश देशमुख आयुक्त,दिव्यांग कल्याण यांच्या शुभहस्ते बालकल्याण संस्था, गणेशखिंड रोड,पुणे थेथे स्विकारला.
प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या सर्व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे आसे गौर उदगार संस्थेचे सेक्रेटरी डॉ नामदेवराव गुंजाळ याणी या प्रसंगी काढले.
