पिंपरणे गावचा देशात झेंडा !
ध्येयप्राप्तीसाठीची दुर्दम्य इच्छाशक्तीने तालुक्यात पिंपरणेतील  पहिली मुलगी यु पी एस सी पास झाली
 पिंपरणे / सुभाष भालेराव 
दुर्दम्‍य इच्‍छाशक्‍ती… अंगभूत असलेला कष्टाळूपणा अन्‌ ठरवले ते करणारच या ध्येयाने झपाटलेली एक शेतकरी कुटुंबातील मुलगी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये झाले होते ग्रॅज्युएशन सायन्स मधून केले… पण ध्येय हे नव्हतेच… डोळ्यांत काहीतरी वेगळेच स्वप्न होते…  प्रचंड अभ्यास करून हे स्वप्न तिने सत्यात उतरवलेच! …अन्‌ राजश्री शांताराम देशमुख ही गावातील पहिली मुलगी जिने यूपीएससी उत्तुंग यश मिळवलं परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं  !  प्रत्‍येक तरुणींनी आदर्शदायी ठरावा असा राजश्रीचा प्रवास थक्‍क करणारा आहे…
  संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शांताराम देशमुख हे भारतीय सेनेत सेवा करून रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर शेती करून मुलांना अतिशय कष्टाने शिकवले त्यांना तीन मुले असून राजश्री सर्वात मोठी धाकटा मुलगा मयूर आणि मुलगी भावना तिघही अत्यंत हुशार मुलं मयूर आणि राजश्री दोघांनीही यूपीएससीची परीक्षा दिली होती त्यात राजश्रीने   दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर गावातील पहिली यूपीएससी परीक्षा पास होण्याचा मान मिळवला
पिंपरणे येथील शेतकरी शांताराम देशमुख हे पत्नी , दोन मुली अन् एक मुलगा अशा कुटुंबासह राहतात. उत्तम शेती करत असताना मुलांनी चांगल्या पदावर काम करावे अशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे मुलांना त्यांनी शिक्षण सुरू केल राजश्रीने दहावीपर्यंतची शिक्षण डेरे इंग्लिश मीडियम मध्ये घेतलं अकरावी बारावी श्रमिक महाविद्यालय आणि त्यानंतर पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्रदान केली शिक्षण इथे न थांबता मनात जिद्द यूपीएससीची होती त्याप्रमाणे तो अभ्यास सुरू केला अन् यूपीएससीचा खडतर अभ्यास तीन वर्ष केला आणि यशस्वी ही झाली राजश्री  हिने ही  जबाबदारी, कर्तव्य व अभ्यास यांची सांगड घालून तीने यू पी एस सी चा  अभ्यासक्रम पूर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले
मुलींवर विश्वास ठेवा
 मुलींन नाव कमावले मुलींना तुम्ही त्यांच्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेऊ द्या त्या वडिलांनी दिलेला विश्वास कधीही तोडत नाही आम्ही कुटुंबाने राजश्री हिच्यावर कायम विश्वास ठेवला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही तिने आमचा विश्वास सार्थ ठरविला याचा अभिमान वाटतो
शांताराम देशमुख
जीवनात कठीण प्रसंगी त्यावर मात करण्याचे वडिलांनी शिकवले
जीवनातील संकटास कणखरपणे सामोरे जाणे गरजेचे असल्याचे राजश्री ने सांगितले
 शैक्षणिक कालावधीत शालेय आई-वडिल भाऊ यांनी घेतलेले आयुष्यभर लक्षात ठेवेल. मात्र वडिलांनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट शिक्षणासाठी दिलेली प्रेरणा कधी विसरणार नाही. मिलिट्री तून रिटायर झाल्यानंतर शेती करून आमचे शिक्षण केलं कशाची आम्हाला कमतरता पडू दिली नाही आमच्यावर टाकलेला समाधान आहे परिस्थितीनेच ध्येयप्राप्तीसाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती मला दिली. गावाने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन कायम लक्षात राहील आता जी पोस्ट मिळेल त्यातून सर्व सामान्यांना न्याय देऊन देशसेवा करणार आहे.
राजश्री शांताराम देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!