गरिबीमुळे कोमल जिद्दीला पेटली आणि पोलीस झाली
कुरण येथील कोमल सोनवणे या मुलीनी जिद्दी व चिकाटीने पोलिस बनत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले !
संगमनेर | लोकवेध live न्यूज
आज पुन्हा सिद्ध झाले पैसा आणि प्रतिष्ठा माणसाला मोठ करत नाही. असावी लागते तर ति स्वतः ची तयारी जिद्दीने चिकाटीने स्वतःला घडवण्याची सत्य हेच आहे की भगवंताने माणुस घडवला परंतू माणसाला स्वतः घडाव लागत हेच सत्य.त्याच हे एक जिवंत उदाहरण म्हणजे . . .
संगमनेर तालुक्यातील कुरण या छोट्याशा खेड्यात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना ही त्यात आई वडिलांना घरकामापासुन ते रोजच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात आई बरोबर खुरप हातात घेऊन खुरपणी पासून ते जवळपास शेतीचे सर्वचं कामे ऊन , पाऊस , थंडी , वारा याच्याशी दोन हाथ करत कष्ट करायची आणि त्यातुन रुप – रुपया जमा करून रात्र अहोरात्र अभ्यास करून सरकारी नोकरी करायची आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हि जिद्द हि चिकाटी हंल्लीच्या मुलींमध्ये बघावयास मिळावं हे जेमतेम कठिणचं म्हणाव लागेल.मोठी स्वप्न बघण्याची दृष्टी हे मात्र प्रत्येकात आढळतं परंतु काय त्या आईवडिलांचे ते स्वप्न मुले पुर्ण करूं शकतात का हा खरा प्रश्न उद्भवतो.असाच काहीसा प्रेरणादायी पश्न आजच्या या बातमीचा आहे कु.कोमल सुभाष सोनवने हीची मुंबई पोलीसात निवड झाली आहे आणि याचा प्रेरणादायी परिणाम हा नुसता कुरण या गावांसाठी नाही तर पंचक्रोशीतील नागरिकांना अभिमान वाटण्याजोगता झाला संपुर्ण तालुक्यातुन कु कोमल सोनवणे हिच्या मुंबई पोलीसात निवड झाल्यानंतर शुभेच्छा वर्षाव होत आहे .
याचेच औचित्य साधत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भालेराव यांनी कु कोमल सोनवणे हिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कु कोमल सोनवणे हिस भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे .
समाज्यातील तळागाळातील गोर गरिब युवा पिढीने कु कोमल सोनवणे हिचा बोध घेऊन आपले स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांचे असे स्वप्न पूर्ण करावे शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बोधवाक्य उच्चार मुला – मुलीनी अनुकरण करावे — सोमनाथ भालेराव
