मुख्याध्यापक संजय बोर्से यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
सम्यक फाउंडेशनच्या वतीने सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपरणे शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय बोर्से यांना क्रांतीसुर्य महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.ओमप्रकाश तथा काका कोयटे,महिला आयोगाच्या सदस्या मा.उत्कर्षाताई रुपवते,विकास मंडळाचे अध्यक्ष विलास गवळी,शिक्षक बॅंकेचे संचालक शशिकांत जेजुरकर,संचालक माणिक कदम,मल्हारराव होळकर यांचे जीवन चरित्रावर पी.एच.डी. केलेले मा.लक्ष्मण नजान सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गटविकास अधिकारी मा.अनिल नागणे साहेब, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,विस्तार अधिकारी श्रीमती सुवर्णा फटांगरे,केंद्रप्रमुख श्री. अशोक गोसावी तसेच पिंपरणे गावातील सर्व संस्थाचे पदाधिकारी,अधिकारी,पिंपरणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच पालक,ग्रामस्थ व पिंपरणे यांनी अभिनंदन केले
