अंभोरेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी.जयंती उत्साहात संपन्न….

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे अखंड भारतात पहिली स्री राज्यकर्ती महिला,उत्कृष्ट प्रशासक,संघटन कौशल्य असलेली प्रजाहित दक्ष,कर्तुत्वान, न्यायिक,समाजातील सर्व घटकांसाठी सर्वासमावेशक काम करणारी ,दानशूर, जगाच्या पाठीवर पहिली महिला,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य जयंती उत्साहात संपन्न झाली.प्रारंभी सकाळी 8 वा.ट्रँक्टर ट्रेलर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींची प्रतिमेची सजावट करुन अंभोरे गावातून प्रमुख मार्गांनी प्रतिमेची डी.जे.वर या मातेचे गाणे वाजवून तरुण,युवकांनी नाचून ताल धरला,भंडा-याची उधळण करित,फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीत जय मल्हार,सदाआनंदाचा येळकोट,पुण्यश्लोक अहिल्यामातेचा विजय असो या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदमून गेला होता.अखेर मिरवणूक संपवून गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्रा समोर येउन थांबली.प्रतिमेवर विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करुन सडा,रांगोळी टाकुण वि द्युत रोषणाई करण्यात आली होती.गावातील प्रमुख मान्यंवर ग्रामपंचायत सरपंच सौ.सुरेखा ताई खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव खेमनर,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री.रावजी भागा खेमनर,व्हाईस चेअरमन श्री.वाल्मिक खेमनर,ग्रामपंचायत सदस्य श्री.भाऊसाहेब रखमा खेमनर,सोसायटी संचालक श्री.रमेशराव खेमनर श्री.सदाशिव खेमनर ,डॉ.प्रा.आण्णासाहेब जगनर,भाऊसाहेब खेमनर,अँड शंकरराव खेमनर,अँड ज्ञानदेव खेमनर,श्रावण खेमनर,अजित बाचकर,श्री.सोपानराव खेमनर,श्री.विठोबा खेमनर,श्री.हौशिराम सोर ,बाबासाहेब खेमनर,श्री.मंगेश जगनर,नंदु खेमनर,श्री.रमेश खेमनर,दुध संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री.तुळशीराम मलगुंडे,संचालक हौशिराम वाघमोडे,श्री.सोपानराव वाघमोडे,श्री.भाऊसाहेब वाघमोडे,श्री.बाबुराव बाचकर,श्री.बाबुराव जगनर,श्री.बबन सुभा खेमनर,आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले.शेवटी या थोर मातेचे चरित्रपर श्री.रावजी भागा खेमनर,डॉ प्रा.आण्णासाहेब जगनर,यांनी मनोगत व्यक्त केली.श्री.सुभाषराव हळ्नोर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग सांगून त्यांच्या महान कार्याचा इतिहास सांगुण जिवन पट मांडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय बजरंग नव तरून मित्र मंडळ अंभोरे गावठान व अंभोरे ग्रामस्थ,तरुण ,युवक मोठ्या संख्खेने उपस्थीत होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!