पिंपरणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
संगमनेर / लोकवेध  live न्यूज
मल्हारराव होळकर यांच्या उत्तराधिकारी म्हणून १७६७ ला अहिल्याबाई स्वतंत्र राज्यकर्त्या झाल्या. स्वराज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत करून स्वराज्य सुखी व संपन्न ठेवण्यामध्ये अहिल्याबाईंची ख्याती होती. शेतजमीचे वाटप दरोडेखोरांचा योग्य बंदोबस्त. , न्यायदान अशे अनेक प्रज्यावत्सल निर्णय अहिल्याबाई होळकर या लोकमातेनें घेतले. त्यांची जयंती
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे पिंपरणे ग्रामपंचायत व अहिल्याबाई होळकर युवा मंचच्या वतीने  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात . यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते
 एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले आहे.
अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर स्त्री शक्ती किती महान आहे, ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला मिळेल. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातून शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानली नाही, त्यामुळेच भारत सरकारने त्यांचा सन्मानही केला, त्यांच्या नावाने टपाल तिकीटही काढण्यात आले आणि आज त्यांनी अहिल्याबाई यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्याबाई होळकर युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!