परमपूज्य गगनगिरी महाराज ज्युनिअर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम
पिंपरणे /  लोकवेध live न्यूज 
फेब्रुवारी मार्च 2023 एचएससी इयत्ता बारावी पुणे बोर्ड परीक्षेच्या निकालामध्ये पिंपरणे तालुका संगमनेर येथील परमपूज्य गगनगिरी महाराज ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सायन्स शाखेचा निकाल 96.63 % लागला असून आर्ट शाखेचा निकाल 77.27% आहे. एकत्रित निकाल 90.84% लागला आहे .
या परीक्षेमध्ये  कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत कोमल अनिल भोसले 73.50% ,निलेश लहानु ठोंबरे 68.67% ,चेतना भिमराज राहिंज 68.17% ,करण भाऊराव खैरे 66.50% ,कल्याणी किसन मांडे 66.17% ,
बारावी सायन्स शाखेतील  गुणवंत विद्यार्थी अथर्व भाऊसाहेब वर्पे 71.33%, प्रथमेश दशरथ वाळे 71.00% ,निमराह समीर शेख 70.17% ,सिद्धी दीपक वाळे 68.50%, प्रणव गोरक्ष गांजवे 67.83% ,अजय विजय खंडागळे 66.33% ,यश संतोष वाकचौरे 66.00% ,काजल बाळासाहेब पानसरे 53.83% ,आकाश बाळू खैरे 52.50% ,ऋतुजा रामनाथ भागवत 52.33% ,
जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची मध्यंतरी ची काही वर्ष ऑनलाईन ऑफलाइन अशा पद्धतीने गेलेली होती. सर्व परिस्थिती पूर्वपदावरती हळूहळू येत असताना यावर्षी प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा केंद्रांवर झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे सुयश कौतुकास्पद आहे .
संस्थेचे पदाधिकारी, स्कुल कमिटी,ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!