डॉ. अस्मिता देशपांडे यांची संगमनेर सिन्नर सेंटरचे अधीक्षक पदी निवड
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी . एम पेटीट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे यांची संगमनेर – सिन्नर सेंटरचे अधीक्षक पदी निवड झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना मिळाले आहे. डॉ.देशपांडे यांनी गेली अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले असून सध्या त्या पेटीट विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पदी नियुक्त आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी संस्थेच्या जयराम भाई हायस्कूल येथेही आपली अध्यापन सेवा केलेली आहे. त्यांना प्रशासकीय सेवाचाही चांगला अनुभव असून अधीक्षक पदाबरोबरच स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी या कमिटीवर शालेय विभागाच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. अस्मिता देशपांडे या अभ्यास मंडळ सदस्य असून पाच वर्षासाठी पुणे येथील बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे याशिवाय अभ्यासक्रम मंडळात देखील त्यांची निवड झाली होती जवळपास 29 वर्षाच्या सेवेत केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांच्यावर संगमनेर सिन्नर सेंटरची जबाबदारी दिली आहे. त्यांचे या निवडीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एच आर मोकळ , वरिष्ठ लिपिक श्री सतीश चंदन , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आहे. याप्रसंगी प्रा. दशरथ गभाले , प्रा. भाऊसाहेब मांढरे , प्रा. शिंदे एस व्ही , प्रा. जाधव यु ए , ग्रंथपाल श्री सांगळे के के , संतोष धुळे , अरुण भिसे , कुणाल गवते आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांचे या निवडीबद्दल संगमनेर , सिन्नर सेंटर मधून सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. अस्मिता देशपांडे यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दी साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
