दे.ना गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या शुभहस्ते दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तळेगाव दिघे / लोकवेध live न्यूज
सामाजिक ,शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे तळेगाव दिघे येथील श्री देवराम नारायण गोडगे प्रतिष्ठान यांच्या वतीने दहावी व बारावी च्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या तळेगाव परिसरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत श्री साईबाबा हॉस्पिटल, बिरोबा मंदिरासमोर, तळेगाव दिघे या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
आदर्श गाव पाटोदा येथील श्री भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होणार आहे. विद्यार्थ्यांना फेटा, प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे प्रतिष्ठानचे हे 2 रे वर्ष आहे .श्री भास्करराव पेरे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट श्री अविनाश शिवाजी गोडगे व डॉ नंदकुमार गोडगे यांनी केलेले आहे
