शेरणी तुला त्या जलनायकाची
निळवंडे लाभक्षेत्रातील नागरिकांनी केली आ.थोरात यांची शेरनी तुला
जलनायक आ. थोरात यांची छबी प्रत्येकाच्या स्टेटसवर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
निळवंडे धरण व कालव्यासाठी सातत्याने ध्यास घेऊन धरणासह कालव्यांची कामे पूर्ण करणारे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नामुळेच दुष्काळी भागात निळवंडेचे पाणी आले असल्याने या भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी जलनायक व निळवंडे कालव्यांचे जनक आमदार बाळासाहेब थोरात यांची अत्यंत मोठ्या उत्साहाने शेरनी तुला केली आहे.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे आमदार थोरात यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी लाभक्षेत्रातील 182 गावातील शेतकऱ्यांच्या वतीने या धरणाचे जनक आमदार बाळासाहेब थोरात यांची मोठ्या उत्साहात व आनंदात शेरनी तुला झाली. यावेळी समवेत माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीत सिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, जि.प.सदस्य महेंद्र गोडगे, संतोष हासे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.. या प्रसंगी आमदार थोरात यांच्या हस्ते आनंदाची व विजयाची जलगुढी ही उभारण्यात आली. जलगुढी उभारतात उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे संगमनेर तालुक्यात आले आहे. या धरणाच्या निर्मितीसाठी व कालव्यांच्या कामांसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांचाच मोठा वाटा राहिला आहे. हे दुष्काळी जनतेला माहित आहे .कोरोना संकटात जग बंद असताना दवाखाने आणि कालव्यांची कामे सुरू होती. ऑक्टोबर 2022 मध्येच हे पाणी येण्याचे नियोजन होते. मात्र सरकार बदलले.
नव्या सरकारला सर्व तयारी झालेली असताना फक्त पाणी सोडायचे होते. धरण व कालव्यांच्या कामात यापूर्वी कोणतेही योगदान न देणाऱ्यांनी मात्र पाणी सोडण्याची संधी मिळाल्याने श्रेयवाद सुरू केला आहे. ज्यांनी कधीही धरण किंवा कालव्यांवर अगदी फेरा सुद्धा मारला नाही. ते आज श्रेयासाठी पुढे येत असल्याची खंत जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी व्यक्त केली असून खरे पाणी कोणी आणले हे जनतेला माहीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार व महिला यांना हे कालवे आमदार थोरात यांनीच केले हे माहित आहे. रात्रंदिवस या कामासाठी ते झटत होते. त्यामुळे बाकीच्यांनी विनाकारण फुकट श्रेयासाठी पुढे येऊ नये अशी चपराक कवठे कमलेश्वर येथील 85 वर्षांचे वयोवृद्ध भडांगे बाबा यांनी श्रेय घेऊ पाहणाऱ्या या पुढार्यांना दिली आहे.
निळवंडेचे पाणी दुष्काळग्रस्त भागात आल्याने प्रत्येक गावात या पाण्याची मोठे जल्लोषात स्वागत होत असून हे दिवस प्रत्येकासाठी सोन्याचे ठरले आहेत. तर पाणी दुष्काळी भागात आल्याने आपल्या जीवनाचे सोने असल्याची भावना काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे
धन्यवाद साहेब प्रत्येकाच्या मोबाईलवर
जीवनाचा ध्यास मानून धरण व कालव्यांची कामे करणारे आमदार थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील तमाम युवक, कार्यकर्ते व तालुक्यात शेतकऱ्यांनी जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांची छबी आपल्या स्टेटस वर ठेवली असून धन्यवाद साहेब अशा कृतज्ञता व्यक्त केल्या आहेत.
