टोमॅटो पिकाचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करा
टोमॅटो उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले
अकोले / लोकवेध live न्यूज
टोमॅटो पिकाचे तातडीने पंचनामे करा या मागणीसाठी आज तहसीलदार थेटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात टोमॅटो उत्पादक शेतकरी,टोमॅटो बियाणे उत्पादक कंपन्यांचे अधिकारी,नर्सरी मालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक यशस्वी रोगग्रस्त टोमॅटो पिकाचे पंचनामे करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेने बियाणे कंपन्यानी पाहुणे कलाकार म्हणून राहू नये, शेतकरी मेळावे घ्यावेत.जबाबदारी निच्छीत करून बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. रोपवाटिका धारकांचे आडिट करावे व रोपे तयार करताना सर्वतोपरी काळजी घ्यावी.या व इतर विषयांवर बैठक संपन्न झाली.लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शेतकर्यांच्या वतीने भव्य एल्गार केला जाईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
