शिक्षणाने माणसाला उज्वल जीवन जगण्याचा मार्ग मिळतो – डॉ गोडगे

“दे.ना. गोडगे प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून साजरा”

तळेगाव / लोकवेध live न्यूज 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ नंदकुमार गोडगे

शिक्षणाचा मूळ पाया हा माणूस म्हणून घडण्यासाठी आहे. शिक्षणातून संस्कार घडणे अपेक्षित असते.याच संस्कारांतून पुढे सुजाण समाज घडत असतो. त्यासाठी शिक्षण व संस्काराने प्रत्येक विद्यार्थ्यांचा पाया पक्का झाला पाहिजे.तरच तो पुढे समाजात टिकू शकतो. शिक्षणाने माणसाला उज्वल जीवन जगण्याचा मार्ग मिळतो.नव्हे तर समाजात मान,सन्मान,प्रतिष्ठा मिळते व स्वाभिमान ही प्राप्त करता येऊ शकतो आणि यशस्वी माणूस होता येते. हे या गुणगौरव सोहळ्यातील यशवंत,गुणवंत विद्यार्थ्याकडे पाहून सिद्ध होत आहे, अशी प्रतिपादन डॉ नंदकुमार गोडगे यांनी केले संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील देना गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला

त्यावेळी ते बोलत होते
तळेगाव दिघे येथील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेले श्री. देवराम नारायण गोडगे प्रतिष्ठानचा द्वितीय वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये दहावी व बारावी मध्ये उत्तम यश मिळवलेल्या तळेगाव परिसरातील गुणवंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श गाव तीगावचे सरपंच श्री डी. के. सानप, प्रमुख पाहुणे न्यायाधीश श्री ममताराम भागवत साहेब ,तळेगावचे माजी सरपंच तात्यासाहेब दिघे,उपसरपंच रमेशभाऊ दिघे , डॉ. नंदकुमार गोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट श्री अविनाश गोडगे, विलास जोरवेकर, मेजर गुंजाळ, शशी जगताप, राहुल जगताप, गणेश भागवत आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. विद्यार्थ्यांना फेटा ,प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह ,गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी परिसरातील विद्युत वितरणामध्ये काम करणाऱ्या वायरमन कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पिंगळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट अविनाश गोडगे यांनी केले. आपल्या पाठीवर कोणीतरी कौतुकाची थाप टाकली व मार्गदर्शन , प्रोत्साहन मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळेस हसू उमजले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!