दिलीप वाकचौरे यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल हिंदी अध्यापक संघाच्या वतीने सत्कार
संगमनेर – लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुका हिंदी अध्यापक संघाचे अध्य क्ष श्री दिलीप वाकचौरे यांची कोकणगाव येथील निझर्णेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नुकतीच निवड झाल्याबद्दल संगमनेर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संघाचे सेक्रेटरी श्री. विकास वनपत्रे , कार्याध्यक्ष संदीप सातपुते , सल्लागार प्रा. गुलाब गायकवाड, जिल्हा संघ विश्वस्त सलीम पठाण , श्री.बाबासाहेब गुंजाळ, मुख्याध्यापक पाडुरंग भागवत ,पंढरीनाथ पथवे, सौ पथवे , राजु बड,बाळासाहेब पिंगळे,सौ.रेणुका दिघे, ज्योती माने , सौ मंगल वाकचौरे , चिरंजीव मनोदय वाकचौरे आदींसह संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना दिलीप वाकचौरे सर म्हणाले की , संगमनेर तालुक्यात हिंदी अध्यापक संघाचे काम अतिशय उत्कृष्ट रीतीने सुरू आहे. संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच विद्यालयांमध्ये राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार प्रसार होण्यासाठी निबंध स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा , काव्यवाचन यासारखे उपक्रमांचे आयोजन करून प्रत्येक विद्यालयातील हिंदी विषय अध्यापकास व विद्यार्थ्यांस या उपक्रमात सहभागी करून हिंदी विषयाचे महत्त्व वाढवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. एक हिंदी विषय अध्यापकास मुख्याध्यापक पदाचा मान मिळाल्याबद्दल मी माझ्या पदाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करेल असे मत यावेळी वाकचौरे यांनी व्यक्त केले .
