गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

दि.१५ जून 2023 रोजी संगमनेर शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी थोरात मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर डी .एम. पेटीट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. मोकळ सर , जुनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा. श्री गुलाब गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रेरणास्थान आदरणीय डॉ.मो. स. गोसावी सर, ब्रांच सेक्रेटरी .डॉ. राम कुलकर्णी सर, संगमनेर सिन्नर विभागाचे अधीक्षक डॉ.सौ. अस्मिता देशपांडे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा पाठविल्या. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!