इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा झटका ! ‘त्या’ वक्तव्यामुळे महाराजांवर गुन्हा दाखल
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनातून लिंगभेदावर वक्तव्य केलं होतं.
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांना त्यांचं वक्तव्य महाग पडलं आहे. त्यांच्या एका वक्तव्यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.
 यांनी एका कीर्तनातून लिंगभेदावर वक्तव्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीरसंबंध झाल्यावर मुलगा/मुलगी होत असल्याचं, ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने छत्रपती संभाजीनगर  न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाने आज यावर निर्णय दिला आहे.
इंदुरीकर महाराज  यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगर कोर्टाने दिला आहे. इंदुरीकर महाराजांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सेशन कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली होती.
दरम्यान, इंदुरीकर महाराज  यांनी शरीर संबंधांवर भाष्य केलं होतं. सम तारखेला शरीरसंबंध झाल्यास मुलगा आणि विषम तारखेला शरीरसंबंध झाल्यास मुलगी होते, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलं होतं.
त्यानंतर इंदुरीकर यांच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात या विरोधात दाद मागण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने इंदोरीकर यांना दिलासा देत गुन्हा रद्द केला होता. या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने छत्रपती संभाजी नगर खंडपीठात धाव घेतली होती.
छत्रपती संभाजी नगर खंडपीठात झालेल्या सुनावणीनंतर इंदोरीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यासंबंधीचे वृत्त लोकशाही या वृत्तवाहिनीने दिले आहे.
इंदोरीकर महाराज यांचा या संबंधातील कीर्तनाचा एक व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यात महाराज लिंगभेदावर भाष्य करताना दिसून येत होते. “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती ही रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते”. असं त्यांनी यात म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!