आईचं बोट धरून शाळेत आलं स्वागत पाहुन भारावल
पिंपरणेत जिल्हा परिषद  शाळेंचा वेलकम डे
पिंपरणे / लोकवेध live न्यूज / सुभाष भालेराव
 शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली… पुस्तकांचा तो खास गंध श्वास भरून मुलांनी घेतला… सुटीत थोडे दूर मामांच्या गावाला गेलेल्यानी दप्तर, डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली… कुणी मित्रांसोबत भावासोबत तर कुणी बाबांच्या स्कूटरवरून तर कुणी आईचं बोट धरून शाळेत आलं. शाळेतही फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या काढल्या होत्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सरपंच श्री नारायण मरभळ अजित देशमुख कृष्णा काळे, कृष्णा राहिंज संजय बागुल गणेश राहींज मेजर, मुख्याध्यापक संजय बोर्से, मंदाकीनी मोदड प्रतिभा दुर्गुडे,सुनिता अस्वले,मंदादेवी गवारी प्रदिप बागुल,अनिता मुरडनर आदि सह पालक, स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांचे गुलाब पुष्प देऊन नवीन ड्रेस व पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. बालवाडीतील आणि नव्याने दाखल झालेल्या पहिलीच्या मुलांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती तर थोड्या मोठ्या किंवा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मात्र, खुप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींना कडकडून मिठी मारत शाळेचा पहिला दिवस मजेशीर घालविला
गावातील सर्व शाळांचा परिसर गजबजलेल्या वातावरणात हरवून गेला होता शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे बुधवारी बहुतांशी शाळेत पालक आपल्या मुलांना पोहोचवायला आले होते. विशेषता नव्याने प्रवेश घेतलेल्या शाळेत मुलं पालकांसोबतच आली. तर पुढच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांची फौज कोणी मित्रांबरोबर तर कोणी वडीलांसोबत भावा बरोबर आली. प पु गगनगिरी विद्यालय,  यांसह गावात बालवाडी, जिल्हा परिषद या सर्व शाळांच्या परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. शाळेच्या पहिल्या दिवसाची काही विद्यार्थ्यांना जितकी उत्सुकता होती तितकीच मुलांबरोबर आलेल्या  पालकांनाही उत्सुकता होती त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही  लपवू शकला नाही काही मुलांच्या चेहऱ्यावर मात्र असुर​क्षिततेची भावना दिसत होती. पहिला दिवस असल्याने
 विद्यार्थ्यांना पुस्तके पेन्सिल दप्तर यांचे वाटप करण्यात आले  सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे जेवण दिल . आईला सोडून शाळेत जाताना छोट्या मुलांनी रडायलाच सुरूवात केल्यामुळे अशा मुलांना शांत करताना शिक्षकांचीही कसोटी लागत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!