अश्वि इंग्लिश स्कूल विद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निमगाव जाळी /लोक वेध live न्यूज / अशोक गोसावी
अश्वि बुद्रुक येथील अश्वि इंग्लिश स्कूल अश्वि विद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील जवळपास 600 विद्यार्थी व 22 शिक्षकांनी योगासने करण्यात सहभाग घेतला. विद्यालयाचे प्राचार्य बर्डे जे आर यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केल्यानंतर योगासन प्रशिक्षक धराडे सर व गाडे मॅडम यांनी प्रार्थनेने योगासनास सुरुवात केली व विद्यार्थ्यांकडून पद्मासन, मकरासन, चक्रासन, हलासन, ताडासन, मयुरासन, धनुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शीर्षासन,कपाळ भारती, अनुलोमविलोम,भ्रमारी आदी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली व योगासनांची काय काय फायदे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. शेवटी शांतीपाठ व मेडीटेशन (ध्यानधारणा) नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक वाकचौरे मॅडम यांनी योगासन प्रशिक्षक धराडे सर यांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
