महिलांनी आपल्या आरोग्य विषयी नेहमीच जागरूक असावे ..- कॅन्सर तज्ञ जयश्रीताई थोरात
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज/ अशोक गोसावी

निमगाव जाळी ता.संगमनेर येथील समृद्धी मंगल कार्यालय येथे मा नामदार बाळासाहेब थोरात व इंद्रजित भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित बांधकाम कामगार महिला मेळावा तसेच महिलांकरिता आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की शासनाच्या विविध उपलब्ध चांगल्या योजनांची माहिती घेऊन आपले जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग करावा त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या व कुटुंबाच्या आरोग्य विषयी नेहमीच सतर्क राहिले पाहिजे विशेषता महिला आपल्या आरोग्य विषयी फारशा जागृत नसतात त्यामुळे त्यांनीआपल्या कुटुंबाचे पर्यायाने समाजाचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वच महिलांनी आपल्या स्वतःच्या आरोग्य विषयी काळजी घ्यावी यावेळी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम व सद्य सामाजिक स्थितीबद्दल विस्तृत माहिती विषद केली.प्रसंगी सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार यांच्या योजनेसंर्भात माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमास निमगाव जाळीच्या प्रथम लोकनियुक महिला सरपंच सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे,अहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघ माजी संचालिका जोंधळे,बांधकाम कामगार जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, चिंचपूर ग्रा प उपसरपंच मीना थेटे, निमगाव जाळी सेवा सह सोसायटी चे संचालक सोमनाथ जोंधळे, ग्रा प सदस्य माऊली डेंगळे, सौ उषा पवार , भास्कर खरात, सोनाली डेंगळे,मंदा जोंधळे,तान्हाजी जोंधळे, संजय वदक, सोमनाथ , दत्तू तळोले, लक्ष्मण बिडवे, आदी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या .
