गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन उद्योजक भाऊसाहेब डेरे यांचा वाढदिवस साजरा
धांदरफळ / लोकवेध live न्यूज / नितीन कोकणे
संगमनेर तालुक्यातील धांदफळ बु.येथील सुपुत्र सध्या गुजरात मधील सील्वासा येथे स्थायिक असलेले सामाजीक कार्यासाठी सदैव तत्पर असणारे उद्योजक भाऊसाहेब कुशाबा डेरे याचा वाढदिवसानिमित्त गावातील लोकमान्य विद्यालय ,जिल्हा.परिषद, अंगणवाडीतील विद्यार्थाना शालेय उपयोगी वस्तु देऊन साजरा करण्यात आला.आपण समाजाचे काही देणे लागतो .या हेतुने अनेक माध्यमातून गरुजुंना मदत करत असतात.हि चळवळ भविष्यात निरंतर सुरु राहवी यासाठी उद्योजक भाऊसाहेब डेरे यांच्या मित्रपरीवारातर्फ विद्यार्थाना शालेय उपयोगी वस्तु वाटुन वाढदिवस साजरा केला जातो.यावेळी उपसरपंच जयदेव डेरे मनोज कवडे स्कुल कमिटी अध्यक्ष ,आशिष गोसावी ,शिरीष कवडे ,कैलास डेरे, बाळासाहेब कवडे ,भिकाजी काळे ,अमोल डेरे , नवनाथ साबळे,विकी गायकवाड ,अशोक बोराडे आदि भाऊसाहेब डेरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
