प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयात पुणे विद्यापीठाची फिरती विज्ञान प्रयोगशाळा

विद्यार्थ्यांनी गिरविले विज्ञानाचे धडे ;ज्येष्ठ विज्ञान शिक्षक डी.आर.सोनवणे व प्रा. मुकुंद डांगे यांचा पुढाकार.
माजी गटशिक्षणाधिकारी स्कूल कमिटीचे सदस्य माननीय सुभाष पवार सर या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी विद्यापीठाच्या प्रतिनिधींचा सत्कार व स्वागत केले.

पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन तयार व्हावा, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री.डी.आर.सोनवणे व प्रा. मुकुंद डांगे यांच्या पुढाकाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फिरती विज्ञान प्रयोगशाळा शुक्रवार दिनांक 23 रोजी प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी विविध विज्ञानाच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांकडून विज्ञानाचे विविध प्रयोग करून घेत त्यांना पुस्तक रुपी भेटवस्तू दिल्या या वेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे धडे गिरवले

डॉ. संजय ढोले सर (समन्वयक फिरती प्रयोगशाळा) नंदराज कोळेकर ( व्यवस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रा. निशांत जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांना लिक्विड नायट्रोजनचे विविध प्रयोग करून दाखविले. लिक्विड नायट्रोजनचा उत्कलनांक बिंदु उन्हे १९६ डिग्री सेल्सिअस असतो. त्याचा परिणाम सजीव निर्जीव वस्तूंवर कसा होतो, याचे विविध प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच, शास्त्राचे विविध प्रयोग नाटकाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. नाटकामध्ये पवनचक्की, सौरऊर्जा, पॉली ऑल आणि आयसो साईनाईट या दोन रसायनांमधून पॉली युरोथीन फोम तयार करण्यात आला. जो खुर्च्याच्या सीटसाठी वापरतात. आठवी व नववीसाठी खास प्लाझ्मा प्रयोग (बायमेटालिक) द्वी धातू पट्टी प्रयोग झाला.

कार्यक्रमाला पहिली ते बारावी चे विद्यार्थी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सतर्फे बनवलेली फिरती प्रयोगशाळेमध्ये प्रा. निशांत जगताप यांनी प्रात्यक्षिके दाखवले. नंदराज कोळेकर,गणेश सोनवणे,रवी मगर, राहुल जगताप, यांनी विज्ञान नाटक सादर केले. प्रफुल्ल म्हसेकर , सोमनाथ मुर्तडक यांनी साहाय्य केले. प्रथमता विद्यालयाच्या विस्तीर्ण क्रीडांगणामध्ये झाडांच्या सावलीमध्ये विद्यापीठाकडून आलेल्या व्यायाम मधून प्रशस्त स्टेज उभारण्यात आले इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित दोन तास विविध प्रयोग विज्ञान नाटिका यातून मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावी या वर्गांमध्ये विविध विज्ञान किटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोग समजून सांगण्यात आले व सदर किट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे म्हणून देण्यात आली

त्यामुळे आजचा दिवस परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयामध्ये या अनोख्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री.डी.आर.सोनवणे सर, श्री आर बी वाळे सर,प्रा. श्री डी के डोंगरे सर श्री दत्तात्रय ठोसर ज्युनियर कॉलेजला विज्ञान विषयी शिकवणारे सर्व प्राध्यापकयांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थी व शिक्षक उस्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाले होते..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!