धक्कादायक! मी देवऋषी आहेत म्हणत तरुणीवर जादूटोणा, लैंगिक अत्याचार, पैशांचा पाऊस पडणारा भोंदूबाबा गजाआड
बाभुळवाडे येथील एका मेंढपाळ कुटुंबातील तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघड झाली
पारनेर | लोकवेध live न्यूज
तालुयातील बाभुळवाडे येथील एका मेंढपाळ कुटुंबातील तरुणीवर पिस्टलचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघड झाली. पैशाचा पाऊस पाडण्याचे व काळ्या जादूद्वारे आर्थिक व लैंगीक शोषण करुन फसवणूक करणार्या भोंदूबाबाच्या पारनेर पोलीसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२, रा. शिर्सुफळ, बारामती, जि. पुणे) असे भोंदूबाबाचे नाव आहे. त्याला पारनेर न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत काळ्या जादूचा वापर करून लोकांचे आर्थिक व लैंगिक शोषण करून फसवणूक करणारे लोक फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक. राकेश ओला यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सूचना देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पो. नि. संभाजी गायकवाड यांनी अशा लोकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दि २१ जूनला पोलीस वरील कृत्य करणार्या लोकांबाबत माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका कुटुंबाला योगी महादेवनाथ बाबा नावाचे एका भोंदूबाबाने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्याचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून रोख रक्कम घेत फसवणूक केली आहे.
या माहितीवरून कुटुंबाची माहिती घेऊन विचारपूस करताना ते भयभीत झालेले कुटुंब पोलीसांकडे तक्रार देण्यास घाबरत होते. परंतु त्यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांची त्याबाबत पीडीतेच्या फिर्यादीवरून भोंदूबाबा योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे याच्याविरूद्ध पारनेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणे करिता व त्यांचे समुळ उच्चाटन करिता अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा केला. तसेच त्याचा शोध घेत मुसया आवळल्या. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, सहा फौजदार शिवाजी कडूस, पोहेकॉ गणेश डहाळे, जालींदर लोंढे, पोना गहिणीनाथ यादव, पोकॉ सुरज कदम, अनिल रोकडे, मयुर तोरडमल, सारंग वाघ, सागर धुमाळ व विवेक दळवी व पथकाने केली आहे. या व्यक्तीने वेगवेगळ्या नावांचा वापर करून वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी किंवा अडचणी दूर करण्यासाठी कोणाची फसवणू केली असल्यास तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक फसवणूक व अत्याचार..भोंदूबाबा महादेवनाथ बाबा याने तो देवऋशी असल्याचे भासवून घरातील मरणार्या मेंढ्या मरू न देण्यासाठी, घरातील लोकांचे आजारपणाचे निवारणासाठी, मुलीचे आजारपण दूर करण्यासाठी जादूटोणा करून होम हवन करण्याचे तसेच त्यांचे घरी पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले. घरातील मुलीचे आजारपण दूर करण्याची पूजा करण्यासाठी त्याचे व तिचे लग्नात काढतात तसे गळ्यात हार व मंगळसूत्र घालतानाचे फोटो काढण्यास भाग पाडून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करून तसेच एअरगनचा धाक दाखवून पीडीतेवर वेऴोवेळी लैगिक अत्याचार केला. कुटुंबाकडून वरील जादूटोणा करण्यासाठी वेळोवेळी ५ लाख ५० हजार रूपये स्विकारून त्यांचे आर्थिक व लैंगिक शोषण करून फसवणूक केली.
