अंजनेरी-ब्रह्मगिरीच्या रोपवे ला विरोध , ग्रामस्थ पर्यावरण प्रेमी एकवटले ; जटायू बचाव , रोपवे हटाव आंदोलन

अंजनेरीची जैवविविधता ब्रह्मगिरीची, पवित्रता अबाधित राखण्यासाठी मेटघर ग्रामस्थ, त्र्यंबकवासी, पर्यावरण प्रेमी एकवटले

नाशिक ( त्रंबक ) / लोकवेध live न्यूज/ निलेश शेकोकार

अंजनेरी-ब्रह्मगिरीच्या खासदार प्रणित प्रस्तावित रोपवेला विरोध करण्यासाठी आज प्रत्यक्ष पुण्यभूमी ब्रह्मगिरी येथे जटायू पूजन करून ग्रामस्थ,पर्यावरण प्रेमींकडून विरोध करण्यात आला. अंजनेरीची जैवविविधता ब्रह्मगिरीची, पवित्रता अबाधित राखण्यासाठी मेटघर ग्रामस्थ, त्र्यंबकवासी, पर्यावरण प्रेमी एकवटले आहेत. नाशिक येथील हुतात्मा स्मारकात पर्यावरण प्रेमींच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज ब्रह्मगिरी पायथ्याशी जटायू पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजने अंतर्गत पर्यटनास चालना देण्यासाठी नाशिकच्या खासदारांचे ब्रह्मगिरी अंजनेरी रोपवे हे स्वप्न आहे. पर्वतीय प्रदेशातील वाहतूक सुलभतेसाठी असणाऱ्या पर्वतमाला योजनेचा खासदारांकडून गैरवापर करून केंद्र सरकारची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. जगविख्यात अती दुर्मिळ जेवविविधतेसाठी प्रसिद्ध अंजनेरी पर्वतताला अभयारण्य घोषित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असतांना येथील खासदारांकडून रोपवे सारख्या जेवविविधतेस धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्पाचे स्वप्न बघणे चुकीचे ठरेल. लाखो भाविकांच्या पायी वारीच्या धार्मिक परंपरेने ब्रम्हगिरी समृद्ध असतांना पर्यटन वाढीसाठी निसर्गाचे नुकसान करून रोपवे करण्याची गरजच काय असा प्रश्न सर्व भाविक विचारत आहेत. अंजनेरी गावात शेतीपूरक व्यवसायास चालना देवून,दैनंदिन सुविधा पुरविण्याचे काम करणे रोपवे पेक्षा जास्त गरजेचे आहे. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक शहरात रोपवेचे स्वप्न मा खासदारांना पूर्ण करता येणे सहज शक्य असून यासाठी ब्रह्मगिरीच्या धार्मिक परंपरा व अंजनेरीची समृद्ध जेवविविधता नष्ट करणे समाज हिताचे ठरणार नाही. ब्रह्मगिरी पर्वतावरील डोलीचा पारंपारिक व्यवसाय कायम स्वरूपी बंद होण्याची भीती मेटघरवासी व त्रंबकनिवासीयांना असल्यामुळे या प्रस्तावित रोपवेस विरोध करण्यासाठी समस्त मेटघर ग्रामस्थ व त्रंबकवासी एकवटले आहेत. जंगल संपत्तीवर अवलंबून असणारे अंजेरीचे मूळ निवासी देखील या रोपवेस विरोध करत आहेत. महाराष्ट्रातील खूप कमी ठिकाणी असणाऱ्यापैकी एक अंजनेरी येथील जटायू पक्षांचा अधिवास नष्ट होण्याची भीतीच यातील तज्ज्ञ संस्थांकडून व्यक्त होत आहे. येथील जंगल वाचविण्यासाठी ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी नागरिक लवकरच वनमंत्र्यांची भेट घेणार आहेत व रोपवे विरुद्धचा लढा तीव्र आंदोलन करून अधिक बळकट करण्याचा निर्णय या प्रसंगी सर्व निसर्ग प्रेमी व ग्रामस्थांकडून घेण्यात आला.रोपवेचा रोप काढून प्रभू राम भक्त जटायूंचा अधिवास टिकवून राहण्यासाठी आज ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मेटघर निवासी,त्रंबकवासी,धर्मगुरू गिरीजानंद सरस्वती महाराज, आनंद आखाडा, त्रंबकेश्वर, मेटघरचे सरपंच झोले, ललित गुरू लोहगावकर, प्रकाश दिवे,कैलास देशमुख व हरित ब्रम्हगिरी सदस्य रमेश अय्यर,भारती जाधव,अरविंद निकुम्ब व अनेक पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.जटायू बचाव,रोपवे हटाव
अंजनेरी-ब्रह्मगिरीच्या खासदार प्रणित प्रस्तावित रोपवेला विरोध करण्यासाठी आज प्रत्यक्ष पुण्यभूमी ब्रह्मगिरी येथे जटायू पूजन करून ग्रामस्थ,पर्यावरण प्रेमींकडून विरोध करण्यात आला. अंजनेरीची जैवविविधता ब्रह्मगिरीची, पवित्रता अबाधित राखण्यासाठी मेटघर ग्रामस्थ, त्र्यंबकवासी, पर्यावरण प्रेमी एकवटले आहेत. नाशिक येथील हुतात्मा स्मारकात पर्यावरण प्रेमींच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज ब्रह्मगिरी पायथ्याशी जटायू पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजने अंतर्गत पर्यटनास चालना देण्यासाठी नाशिकच्या खासदारांचे ब्रह्मगिरी अंजनेरी रोपवे हे स्वप्न आहे. पर्वतीय प्रदेशातील वाहतूक सुलभतेसाठी असणाऱ्या पर्वतमाला योजनेचा खासदारांकडून गैरवापर करून केंद्र सरकारची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. जगविख्यात अती दुर्मिळ जेवविविधतेसाठी प्रसिद्ध अंजनेरी पर्वतताला अभयारण्य घोषित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असतांना येथील खासदारांकडून रोपवे सारख्या जेवविविधतेस धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्पाचे स्वप्न बघणे चुकीचे ठरेल. लाखो भाविकांच्या पायी वारीच्या धार्मिक परंपरेने ब्रम्हगिरी समृद्ध असतांना पर्यटन वाढीसाठी निसर्गाचे नुकसान करून रोपवे करण्याची गरजच काय असा प्रश्न सर्व भाविक विचारत आहेत. अंजनेरी गावात शेतीपूरक व्यवसायास चालना देवून,दैनंदिन सुविधा पुरविण्याचे काम करणे रोपवे पेक्षा जास्त गरजेचे आहे. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक शहरात रोपवेचे स्वप्न मा खासदारांना पूर्ण करता येणे सहज शक्य असून यासाठी ब्रह्मगिरीच्या धार्मिक परंपरा व अंजनेरीची समृद्ध जेवविविधता नष्ट करणे समाज हिताचे ठरणार नाही. ब्रह्मगिरी पर्वतावरील डोलीचा पारंपारिक व्यवसाय कायम स्वरूपी बंद होण्याची भीती मेटघरवासी व त्रंबकनिवासीयांना असल्यामुळे या प्रस्तावित रोपवेस विरोध करण्यासाठी समस्त मेटघर ग्रामस्थ व त्रंबकवासी एकवटले आहेत. जंगल संपत्तीवर अवलंबून असणारे अंजेरीचे मूळ निवासी देखील या रोपवेस विरोध करत आहेत. महाराष्ट्रातील खूप कमी ठिकाणी असणाऱ्यापैकी एक अंजनेरी येथील जटायू पक्षांचा अधिवास नष्ट होण्याची भीतीच यातील तज्ज्ञ संस्थांकडून व्यक्त होत आहे. येथील जंगल वाचविण्यासाठी ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी नागरिक लवकरच वनमंत्र्यांची भेट घेणार आहेत व रोपवे विरुद्धचा लढा तीव्र आंदोलन करून अधिक बळकट करण्याचा निर्णय या प्रसंगी सर्व निसर्ग प्रेमी व ग्रामस्थांकडून घेण्यात आला.रोपवेचा रोप काढून प्रभू राम भक्त जटायूंचा अधिवास टिकवून राहण्यासाठी आज ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मेटघर निवासी,त्रंबकवासी,धर्मगुरू गिरीजानंद सरस्वती महाराज, आनंद आखाडा, त्रंबकेश्वर, मेटघरचे सरपंच झोले, ललित गुरू लोहगावकर, प्रकाश दिवे,कैलास देशमुख व हरित ब्रम्हगिरी सदस्य रमेश अय्यर,भारती जाधव,अरविंद निकुम्ब व अनेक पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!