राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी तानाजी देशमुख यांची निवड

अंबाजोगाई / लोक वेध live / न्युज सुरेश मंत्री

अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून तानाजी देशमुख यांची निवड बद्दल अभिनंदन होत आहे.

अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी देशमुख यांची अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राजपाल लोमटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तानाजी देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वागत होत असून अंबाजोगाई तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!