आदर्श विद्या मंदिरचे सुयश
सोनई / लोकवेध live न्यूज
नुकत्या झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर सोनई या शाळेतील विद्यार्थी कु.प्रतीक्षा जगदाळे ,कु.दिशा बडे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे गोर्ड मेडल व सिल्वर मेडल मिळवले असून सदर विद्यार्थ्यांची पुणे बालेवाडी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. बॉक्सिंग कोच पै पानसरे सीबी,महादेव जाधव यांनी मार्गदर्शन केले व या कार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक खेसमाळसकर भाऊसाहेब ,अशोक दराडे ,राजेंद्र डाके, रोहिणी आढाव यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच संस्थेचे सचिव रविराज पाटील गडाख, जयश्री ताई गडाख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांचे व पालकांचे या कार्याबद्दल सोनईच्या पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
