पेटिट ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

शहरातील सर डी. एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाच्या अधीक्षक डॉ. अस्मिता देशपांडे सह प्रमुख पाहुणे म्हणून माजी इन्चार्ज तथा अधीक्षक प्रा. शशांक गंधे, अहमदनगर जिल्हा संपर्क अधिकारी बाबासाहेब मेमाने , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. गंधे बोलताना म्हणाले की , प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जे – जे मार्गदर्शन करतात ते सर्वच गुरु वंदनीय असतात. याप्रसंगी कु. नेहा दारोळे, संजना कांदळकर ,अपूर्वा बटवाल , सोहम शेटे, आजिनाथ गायकवाड, ओंकार अभंग , बाबासाहेब मेमाने , प्रा. परेश सांगवीकर या सर्वांनी गुरु विषयी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले. प्रा. स्वप्निल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १२ वी विज्ञान वर्गातील साक्षी भोसले, ज्योती भोसले, साक्षी चारुडे, श्रीनिरंजन थिटमे, शिव प्रसाद खताळ, प्रतीक यादव , आवजीनाथ गायकवाड या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय सूत्रांच्या भितीपत्रकाचे अनावरण ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. मोनिका अंबरे ” ऑरगॅनिक केमिस्ट “, विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. अस्मिता देशपांडे म्हणाल्या की, आई वडील हे आपले प्रथम गुरु आहे. आई-वडिलांनंतर जीवनातील दुसरे गुरु शिक्षक असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांसह शिक्षकांचा जीवनात नेहमी आदर करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दशरथ गभाले, पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती शिंदे एस व्ही , सूत्रसंचालन प्रा.रूपाली देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. भाऊसाहेब मांढरे , प्रा. अमोल टेमक, प्रा. सिमिका मिश्रा, प्रा.उषा जाधव , प्रा. सुशीला चिमणकर , श्रीमती मनीषा खाटेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!