दाढ खुर्द येथे येत्या पंधरा दिवसात सार्वजनिक मुतारी व शौचालय न झाल्यास रिपाई लहुजी सेना काँग्रेस अन्य संघटना ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात उपोषण करणार
दाढ खुर्द / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे गेल्या तीन महिन्यापूर्वी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पक्ष गवई गट भारतीय लहुजी सेना आदी संघटने दाढ खुर्द गावामध्ये सार्वजनिक उतारी व शौचालय बांधावे याकरिता निवेदन देऊन बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली होती त्या बातमीला ग्रामपंचायत प्रशासनाने व सरपंचाने केराची टोपली दिल्याने येथील वरील तीनही संघटना येत्या पंधरा दिवसांमध्ये ग्रामपंचायतीने सार्वजनिक मुतारी व शौचालय न बांधल्यास ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात संगमनेर येथील पंचायत समिती समोर अमरण उपोषण केले जाईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे आश्वी गटाचे गटनेते किशोर जोशी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे भारतीय लहुजी सेनेचे दगडू साळवे यांनी उपोषणाचा इशारा दिला असून दाढ खुर्द हे गाव दळणवळणाच्या दृष्टिकोनातून कोल्हार लोणी संगमनेर राहुरी या रोडवर असून या रोडने जाणाऱ्या येणाऱ्यांची लोकसंख्या जास्त प्रमाणात असून दाढ खुर्द गावची लोकसंख्या अंदाजे तीन ते साडेतीन हजार असून ग्रामपंचायतीने निर्मल ग्राम स्वच्छता अभियान यांच्यासह अनेक पुरस्कार प्राप्त केले
असून शौचालय व सार्वजनिक मुतारी ही ग्रामपंचायतने फक्त कागदपत्रे ठेवली असून प्रत्यक्ष मात्र नागरिकांना त्याचा कोणताही लाभ नसून गावातील महिला वर्गांचा व पुरुष वर्गाचा सार्वजनिक कार्यक्रम गावांमध्ये असल्यामुळे गावामध्ये आल्यानंतर मोठी कुचंबना होत आहे याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच दुर्लक्ष करीत असून बाकीच्या योजना चा प्रसिद्धी माध्यम चालवत आहे त्यामुळे दाढ खुर्द गावामध्ये ज्यावेळेस मोठाले कार्यक्रम असतात त्यावेळी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने येथे पंधरा दिवसांमध्ये सार्वजनिक मुतारीचे व शौचालयाचे काम त्वरित सुरू करा अन्यथा नगरपालिकाप्रमाणे फिरते शौचालय व मुतारी गावाच्या चारही दिशेला उभे करावे कारण गावांमध्ये राहणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असून येथील नागरिकांना मुतारी व शौचालयाचा नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही साईड चा वापर करावा लागतो यामुळे रस्त्याने जा ये करणाऱ्याला व शाळकरी मुला मुलींना दुर्गंधीचा त्रास होतो त्यामुळे जनतेची अडचण समजून तात्काळ ग्रामपंचायतीने फिरते शौचालय व मुतारी व बांधकाम करून उभे करावे असे आवाहन काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पक्ष भारतीय लहुजी सेना च्या कार्यकर्त्यांनी केले आहे
