अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व पिंपरणे जि प शाळेमधील विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त गाण्यांमधून संवाद

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या संकल्पनेतून सातत्याने विविध उपक्रम घेतले जात असून विद्यार्थ्यांची एकमेकांमध्ये मैत्री अधिक घट्ट व्हावी यासाठी तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत कृतीयुक्त गाण्यांच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागीत आनंद लुटला

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या वतीने अंभोरे ,पिंपरणे, जाखुरी, देवगाव या वस्ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अॅप्रोच या उपक्रमातून कृतीयुक्त गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड ,श्रीमती शोभा हजारे, मेघा अभंग, पौर्णिमा डगळे, जयश्री मिसाळ ,अनुपमा राहणे, डावरे मॅडम, देशमुख मॅडम, ननवरे सर ,मुख्याध्यापक संजय बोर्से, मंदाकीनी मोदड प्रतिभा दुर्गुडे,सुनिता अस्वले,मंदादेवी गवारी प्रदिप बागुल,अनिता मुरडनर यांनी सहभाग घेतला.

अमृतवाहिनी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनाही इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने अप्रोच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संवादास समवेत कृतीयुक्त गाण्यांमधून विविध कार्यक्रम होत आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंग्रजी व गणित या विषयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अधिक ज्ञान मिळावे याकरता विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना तालुक्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानुसार अमृतवाहिनी मॉडेल स्कूलने कृतीयुक्त गाण्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढावा. मैत्री होत आत्मविश्वास वाढवा. याकरता अॅप्रोच या उपक्रमाचे आयोजन केले आहे .या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांमधून हसत खेळत एकत्रित आनंद लुटला.

या कृतीयुक्त अभिनव उपक्रमाचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा विवेक धुमाळ, प्राचार्य शितल गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!