जिल्हा परिषद प्राथ.शाळा खरशिंदे येथे पालक मेळवा उत्साहात साजरा.

खरशिंदे / लोकवेध live न्यूज/भैय्या इनामदार

संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरशिंदे येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. भैय्या इनामदार हे होते. या मेळाव्यासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या प्रसंगी शाळेत नव्याने बदली होऊन आलेले श्री. गागरे सर यांचा शाळा व्यवस्थापन समिती. पालक वर्ग यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत नव्याने झालेले चांगले बदल पाहून पालकांनी  समाधान व्यक्त केले.
पालक मेळाव्याचे प्रास्तविक भी. गावडे सर यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. विजय सूर्यभान पोपळघट यांची बिनविरोध निवड झाली. या प्रसंगी बोलतांना श्री. विजय पोपळघट यांनी शाळेच्या गुणवत्तेची हमी सर्व पालकांना दिली. हा मेळावा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात
पार पडला. श्रीम. माने उज्वला मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून मेळाव्याचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!