संगमनेर येथे युवा सेनेचा युवा संपर्क अभियान मेळावा संपन्न,

युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अंकित जी प्रभू, विराज कावाडीया व बबन नाना घोलप यांनी केले मार्गदर्शन

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

महाराष्ट्राचा राजकारणामध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या अनेक शिलेदार शिवसेना सोडून गद्दार गटात सामील झाले परंतु शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची लोकप्रियता काही कमी होईना उलट दिवसेंदिवस ती वाढतच आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे युवा नेते युवा हृदय सम्राट आदित्य साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी युवा सेनेने सुद्धा जोरदार तयारी सुरू केलेली आहे आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा व इतर सर्व निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेने सोबत युवा सेनेने देखील जोमाने कामाला सुरुवात केलेली आहे याच पार्श्वभूमीवर आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित जी प्रभू साहेब विराजजी कावाडिया साहेब व शिर्डी लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख बबन नाना घोलप विधानसभा संपर्कप्रमुख अजय जी व्हनोळे व शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश जी साटम यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे व्यापारी हॉल येथे युवा सेनेचा मेळावा संपन्न झाला, सदर मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, *यावेळी युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित जी प्रभू साहेब यांनी मार्गदर्शन करताना शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या 40 गद्दार व इतरांवर जोरदार टीका केली तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे युवा सैनिकांना आवाहन करीत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले व महाराष्ट्रातील भाजप हे कोणतीही निवडणूक घेत नाही निवडणूक घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे कारण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता कमी होत नाही तर दिवसेंदिवस ती वाढत आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या* यावेळी विभागीय सचिव कावाडिया यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना युवासेना सर्व पदाधिकारी व संपर्कप्रमुखांचे कौतुक केले तसेच शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांनी मार्गदर्शन करताना आगामी सर्व निवडणुका ह्या लढाईच्या आणि जिंकायच्या या उद्देशाने तयारी करण्याचे सांगितले तसेच शिवसेना पक्षात जो प्रामाणिकपणे काम करणार नाही त्याला बाजूला करून प्रामाणिक शिवसैनिकांना संधी देणार असल्याचे सांगितले* यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले तसेच युवासेना शिर्डी लोकसभा विस्तारक मितेशजी साटम यांनीही मार्गदर्शन केले व युवकांना पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना ताई मोरे यांनी देखील मार्गदर्शन केले शिवसेना संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी आगामी काळात शिवसेना युवासेना एकत्रित उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही देत संपर्कप्रमुख व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश हासे ,अकोले तालुकाप्रमुख मनोज मोरे, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संजय फड ,यांनी भाषणे केली सूत्रसंचालन युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे यांनी केले तर स्वागत युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केले आभार शिवसेना तालुका संघटक राजू सातपुते यांनी मानले यावेळी संगमनेर अकोला शिर्डी येथील युवा सेना शिवसेना पदाधिकारी महिला आघाडीच्या कोपरगाव शहर प्रमुख विसपुते ताई संगमनेरच्या शितलताई हासे ,आशा केदारी संगीता गायकवाड वैशाली वडतले युवा सेनेचे जिल्हा समन्वयक फैसल सय्यद ,उपजिल्हा समन्वयक पप्पू कानकाटे उपजिल्हाप्रमुख युवा सेना वैभव अभंग तालुका समन्वयक अक्षय बिलाडे विधानसभा प्रमुख अमोल डुकरे तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ तालुका प्रमुख पठार भाग योगेश खेमनर ,युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, उपतालुकाप्रमुख सागर भागवत, जना नागरे ,सचिन साळवे, फरोज कतारी ,सोबत शिवसेना उपशहर प्रमुख मुस्लिम मावळा अजिज मोमीन इम्तियाज शेख दीपक वन्नम सुदर्शन ईटप वेणुगोपाल लाहोटी ,दीपक साळुंखे, उपस्थित होते व अकोला शहर प्रमुख नितीन नाईकवाडी माधवराव तीटमे संदेश एखंडे,महेश हासे राहुल लांडे ,संगमनेरचे सदाशिव हासे माधव फुलमाळी भीमा अनाप व शिर्डी संगमनेर अकोले तालुक्यातील अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!