शिवजयंती उत्सव युवक समितीची कार्यकारणी जाहिर
अध्यक्ष पदी कपिल क्षत्रीय तर उपाध्यक्ष पदी अक्षय कर्पे,विक्रम कतारी
संगमनेर लोकवेध live न्यूज 
तिथी प्रमाणे 10 मार्च 2023 मध्ये साजर्‍या होणार्‍या शिवजन्मोत्सवाची तयारी आता जोर धरू लागली आहे.  युवकांचे मोठे संघटन असलेली छत्रपती फाउंडेशन संचलित शिवजयंती उत्सव युवक समितीची शनिवार (दि.25) रोजी संगमनेरचे ग्राम दैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदिरात व्यापक बैठक होऊन या वर्षीची नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. तिथी नुसार साजर्‍या होणार्‍या या वर्षाच्या शिवजयंतीच्या अध्यक्ष पदी कपिल क्षत्रीय यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कोरोनाच्या काळात शहर आणि तालुक्यात समाजसेवी काम करणार्‍या संघटनांमधील शिवजयंती उत्सव युवक समिती ही एक संघटना आहे. शहर आणि तालुक्यातील गावांमधून तरुणांचे राजकारण विरहीत एकत्रीकरण करून विधायक काम ही संघटना करत असते.
       या वर्षी साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीच्या अध्यक्ष पदी कपिल क्षत्रीय, उपाध्यक्ष पदी अक्षय कर्पे,विक्रम कतारी,कार्याध्यक्ष सागर कानकाटे,निलेश पवार,सह कार्याध्यक्ष अनिकेत गुत्तीकोंडा,सोमनाथ घोडेकर,सचिव-सागर पगारे,सह सचिव-आप्पा गायकवाड,खजिनदार-संतोष वलवे,सह खजिनदार-विकी जजित,मोटार सायकल रॅलीप्रमुख-शुभम परदेशी,सहरॅलीप्रमुख-शुभम भोईर,कृष्णा काजळे,सुमित पानसरे,आकाश गुंजाळ,प्रसिद्धी प्रमुख-मयूर आडेप,लाला दायमा,कुमार ताल्ला,सूरज कळसकर,सौरभ उमरजी,अदित्य बढे,शहर संघटक-तुषार जेधे,साया शिंदे,आनंद गांधी,विशाल ढोले,साईराज बोप्पा, प्रतिक गाडेकर,विनायक वराडे,तालुका संघटक-रोशन गोफणे,जग्गु शिंदे,ओंकार थोरात,सचिन खुळे,सूरज हिंगे,संदिप मेहेर, मुसल्या शिंदे,कायदेविषयक सल्लागार-अँड.विशाल जाधव,सुशांत कवडे,शोन थोरात,प्रसाद भंडागे,सागर ढगे, शहर संपर्क प्रमुख,संदिप वराडे,अक्षय घोरपडे,मुकेश परदेशी,आकाश इगेवार,सचिन अरगडे,ऋतिक अनमल,प्रकल्प प्रमुख-जितेंद्र पाटिल सर,तुषार ओहरा,शेखर कानडे सर,राजिव साळवे सर,किरण वर्पे,अमित पवार(लाठिकाठी),मंगेश पाथरकर,प्रतिक नेवासकर,कुलदिप कागडे सर,तालुका संपर्कप्रमुख-सिद्धांत गुंजाळ,सागर शिंदे,महेश कोल्हे,सोमनाथ गडाख,शहर समन्वयक-अक्षय दासरी,कैलास पवार,प्रथमेश गरुडकर,सागर शिरसुल्ला,तालुका समन्वयक-विजय पांढरे,अभिजित गुंजाळ,अभिषेक काळे,राहुल अंभग,गौरव शिंदे आदींची एक मताने निवड करण्यात आली.
    या बैठकीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी मंगेश सालपे यांनी “जय भवानी जय शिवराय” हे पद्य गात सुरवात केली.तर प्रास्ताविक अमर कतारी यांनी केले. मागील वर्षाच्या जमा-खर्चाचा हिशोब आणि अहवाल वाचन अंबादास आडेप यांनी केले.नरेश माळवे,सोमनाथ भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करत महत्वपूर्ण सूचना मांडल्या.या वर्षाच्या अध्यक्ष पदाची सूचना माजी अध्यक्ष विजय पवार यांनी मांडली तर सर्व उपस्थितांचे आभार शैलेश कलंत्री यांनी मानले.
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!