संगमनेर तालुक्यातील आंभोरे येथील ग्रामपंचायत ने पाणी फाउंडेशन आयोजीत फार्मर कप २०२३ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून सहभागी होण्यासाठीचे पत्र सरपंच सौ सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव खेमनर यांनी स्वीकारले यावेळी ,ग्रामपंचायत सदस्य .भाऊसाहेब रखमा खेमनर,प्रा.नारायण सहादु खेमनर,.सदाशिव किसनराव खेमनर सर्व सदस्य..बाबुराव जगनर , भाऊसाहेब खेमनर .गोरख कदम,.बाळासाहेब खेमनर आंभोरे ग्रामपंचायत ने सहभागी होण्याचे पत्र व माहिती देण्याअगोदरच फार्मर कप स्पर्धेत रजिस्ट्रेशन करून सहभाग घेतला होता याचा सर्व पाठपुरावा व रजिस्ट्रेशन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन बाळासाहेब खेमनर यांनी केले त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिशय सक्रिय टीम पाणी फाउंडेशन साठी तयार केली गावाला फार्मर कप स्पर्धेविषयी सर्व टिमला सविस्तर माहिती दिली. संपूर्ण तयारीसह नियोजन बध्द आंभोरे ग्रामपंचायत ने फार्मर कप २०२३ स्पर्धेसाठी भाग घेतला .आंभोरे ग्रामपंचायत चे सर्व टिमचे गावाचे पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतल्याबद्दल मा.मंत्री आ. बाळासाहेब थोरात , राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, अंभोरे गावचे मा सरपंच भास्कर खेमनर यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

