बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना आला संशय ; चौकशी केली असता मिळाली वीस हजार देशी रुपयाची दारू
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली संगमनेर शिबलापूर रस्त्यावर जाखुरी येथे ही कारवाई करण्यात आली असून २० हजार एकशे साठ रुपये किमतीचे सहा बॉक्स देशी दारू, ५० हजार रुपये किमतीची मोटरसायकल इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला
एक्टिवा क्रमांक M H 17 CL 8282 नंबरच्या मोटरसायकल वरून संगमनेरहून आरोपी हरीश दिलीप थोरात रा इंदिरानगर गल्ली क्रमांक ८ संगमनेर एक्टिवावरून दारूचे बॉक्स घेऊन संगमनेर शिबलापुर रस्त्यावरून चालला होता जाखुरी या ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताह मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्या मोटरसायकलचा संशयाला असता त्यांनी त्या मोटर सायकल ला थांबवले आणि विचारपूस केली असता मोटरसायकलवर सफेद गोण्यांमध्ये सहा बॉक्स दारूचे ठेवलेले आढळले पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांच्या फिर्यादीनुसार हरीश दिलीप थोरात यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अ. ई नुसार 502/ 2023 गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यावेळी जाखुरीचे पोलीस पाटील, पिंपरणेचे पोलीस पाटील विनोद साळवे शिवाजी पानसरे यांनी मदत केली
पुढील तपास परी.पोलीस अधीक्षक शिरीष वमने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल बिलाल शेख पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट हे करत आहे
