प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यशाळा
गुरुवार दि.३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती .
महसूल विभाग महाराष्ट्र शासन कामगार तलाठी कार्यालयाच्या व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अहमदनगर रेस्क्यू विभागाचे आपदा मित्र प्रशांत पांडे ,नवनाथ सिनारे, आकाश देशमुख, आकाश कुटे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापना संदर्भात विविध प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. पुराच्या वेळी तसेच आग लागल्यानंतर कशा पद्धतीने व्यवस्थापन करावे. स्वतःचा व इतरांचा जीव वाचवावा.याविषयी सविस्तर माहिती दिली. इयत्ता सातवी ते दहावीच्या विज्ञान विषयांमध्ये यासंदर्भात अभ्यासक्रमातही घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विविध अपघाताच्या वेळी रुग्णांना सुरक्षित रितीने कसे हलवावे त्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. या कार्यक्रमास पिंपरणेचे कामगार तलाठी माननीय संग्राम देशमुख संस्थेचे सचिव कैलास शेठ काळे तसेच स्कूल कमिटीचे सदस्य माननीय सुभाष पवार सर प्राचार्य मुकुंद डांगे तसेच काकासाहेब गिरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा दिलीप डोंगरे यांनी केले अध्यक्षीय सूचना प्रा वैशाली कुटे यांनी मांडली अनुमोदन प्रा राजश्री मांढरे यांनी दिले उपस्थित विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये या सर्व प्रात्यक्षिकांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. उपकरणांची हाताळणी केली.
