रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे रयत बँकेच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्प दरात सायकल वितरण

रयत बँकेच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत

 

निमगाव जाळी  / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय,सात्रळ येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून दि.रयत सेवक को-ऑफ.बॅंक लि.सातारा, शाखा श्रामपूरच्या वतीने रयत संकुलातील विद्यार्थ्यांना अल्पदरात सायकलचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते पंकज कडू पाटील, सात्रळचे सरपंच सतीश ताठे,
ग्रामविकासअधिकारी म्हस्के,तलाठी भाऊसाहेब, प्राचार्या एस.आर.थोरात, म्हैसकर,विजय साबळे, शिंदे आदि मान्यवर व विद्यालयातील सर्व सेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील उपशिक्षक रयत सेवक बँक,सातारा,श्रीरामपूर शाखा प्रतिनिधी शिवदास सातपुते यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून रयत बँकेच्या वतीने सभासद व विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अल्प दरात सायकल वितरण प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
रयत सेवक को. ऑप.बँक लि.सातारा चेअरमन नंदकिशोर गायकवाड, व्हा. चेअरमन प्रा.अशोक झरेकर, संचालक राजेंद्र शिर्के,दिपक भोये,श्री दिलीप तुपे,अशोक कोलते,विक्रमसिंह देसाई, राम केदार, धनंजय कच्छवे, सुरेश तिटकारे,श्रीमती ज्योस्त्ना बाळसराफ, बाळासाहेब जगताप सौ.रेश्मा खुटारकर या संचालक मंडळाने आपल्या रयत शिक्षण संस्थेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या दररोजच्या प्रवासासाठी सवलतीच्या दरात गिअर व नॉन गिअर सायकल उपलब्ध करून दिल्या. या सवलतीच्या प्रकल्पाचा फायदा घेऊन अनेक विद्यार्थी सायकल घेत आहेत.पालक वर्गसुद्धा या सायकल खरेदीस उस्फुर्त प्रतिसाद देत आहे.
सायकल उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचे व्हा.चेअरमन प्रा.अशोक झरेकर ,ज्येष्ठ संचालक राजेंद्र शिर्के,दिपक भोये,श्रीरामपूर शाखा सभासद प्रतिनिधी सौ.अनुसया मरभळ, सुदर्शन गीते व रयत बँक शाखा श्रीरामपूर सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्र.पर्यवेक्षक त्रिंबक राशिनकर यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी तर आभार ज्येष्ठ उपशिक्षक युनुस पठाण यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक केशव मुसमाडे, सचि्दानंद झावरे,भारत कोहकडे, संजय दिघे,सतिश नालकर, प्रकाश कुलथे, वैभव वसावे,ज्ञानदेव लेंडे, देविदास थोरात,सुदर्शन गिते,सुनिता ढोकणे,गिताजंली गोसावी,प्रांजली फरकाडे, पल्लवी गावडे,प्रविणाताई दिघे, कावेरी वदक,सविता जेजूरकर,सुमेष शिंदे,प्रमिला पंडोरे, जालिंदर बनगये रत्नाकर सोनवणे, ज्ञानदेव माळी,राजू पेटारे, रामदास साबळे आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!