न्यू इंग्लिश स्कूल ,आडगाव विदयालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
राहाता / लोकवेध live न्यूज
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .हिंडे मुरलीधर व पर्यवेक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . भोये निवृत्ती यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .
कार्यक्रमाप्रसंगी
बेलदार गुंजन , शेख सोफिया , राखी सिंह , रसाळ श्रृतिका , नवले श्वेता , जाधव संजना , जाधव श्रावणी , शेख सोनिया , महाजन संस्कृती , रिकामे दर्शन , आकात श्रुतीका क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित भाषने केली.
विदयालयातील शिक्षक श्री . तुपे प्रसाद यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्याविषयी व प्रखर देशभक्ती यांचा आर्दश मुलांनी घ्यावा असे भाषणात उल्लेख केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .श्री . हिंडे मुरलीधर यांनी भाषण केलेल्या सर्व मुलांचे अभिनंदन करून , क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या देशसेवेविषयी माहिती दिली .
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ शिक्षिका सौ .भवर रोहिणी, श्री.बागले कैलास , श्री माळेकर अतुल , श्री .पोतदार रविंद्र श्री .फुलमाळी संतोष , सौ . पवार अर्चना सौ .शेळके हेमा सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु झोमान भक्ती व तुपसाखरे भक्ती तर आभार कु. अपूर्वा लभडे हिने मानले . कार्यकमाचे नियोजन श्रीम . गवळी रेखा यांनी केले .
